मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, ‘हे’ आहे कारण

मुंबई तक

• 01:23 PM • 12 Nov 2021

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि एसटी कर्मचारी संघटनेचं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत आहेत. सध्या सुरू असणारा एसटीचा संप हे या भेटीमागचं कारण आहे. राज ठाकरे यांना कालच एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ भेटलं होतं. तुम्ही कुणीही आत्महत्या करू नका. आत्महत्या करणं हा उपाय नाही ही अट कर्मचाऱ्यांपुढे […]

Mumbaitak
follow google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि एसटी कर्मचारी संघटनेचं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत आहेत. सध्या सुरू असणारा एसटीचा संप हे या भेटीमागचं कारण आहे. राज ठाकरे यांना कालच एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ भेटलं होतं. तुम्ही कुणीही आत्महत्या करू नका. आत्महत्या करणं हा उपाय नाही ही अट कर्मचाऱ्यांपुढे राज ठाकरेंनी ठेवली आहे आणि त्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्यानंतर आज राज ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत.

हे वाचलं का?

राज ठाकरे एसटी कामगारांची काय बाजू मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राज ठाकरे या भेटीनंतर आंदोलनाबाबत काय भूमिका मांडतात, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. राज ठाकरे यांनी परिवहन मंत्र्यांसोबत चर्चा न करता थेट शरद पवारांची भेट घेतली आहे, त्यामुळे या भेटीला वेगळं महत्त्व असल्याचं मानलं जातंय.

दुसरीकडे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा एसटी कामगारांना संप मागे घेण्याचं आणि कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, मी पुन्हा आवाहन करतो की, त्यांनी कामावर जावं, नुकसान होणार नाही. राजकीय पक्ष आपला वापर करेल, मात्र तुमचं नुकसान भरुन निघणारं नाही. सदाभाऊ खोत, पडळकर संप भडकावण्याचं काम करतायत, त्यांची जबाबदारी कोण घेणार नाहीत. ते हळूहळू संपापासून दूर जातील. कामगारांनी विवेकाने विचार करावा. कोरोनाच्या काळातील नुकसानाच्या पार्श्वभूमीवर आणखी नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी, असंही त्यांनी म्हटलंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांसमोर ठेवली एक अट, म्हणाले…

बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंनी काय प्रतिक्रिया दिली?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती बरी नसल्याने ते रूग्णालयात आहेत. त्यामुळे शरद पवारांची भेट राज ठाकरेंनी घेतली. सातवा वेतन आयोग लागू कराही प्रमुख मागणी राज ठाकरेंनी केली आहे. विलीनकरणाचा मुद्दा हा गुंतागुंतीचा आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत भेट झाल्यानंतरराज ठाकरेंनी शरद पवार यांची वेळ घेतली होती. त्यानुसार ही भेट होती. मुख्यमंत्री बरे झाल्यानंतर राज ठाकरे त्यांची आणि शरद पवारांची भेट घेतील असं आज बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंनी सांगितलं. अनिल परब यांना डावलण्याचं काहीही कारण नाही असंही या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp