राज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कोसळलं, गोरेगावातल्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते गोरेगावातील मनसे शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला. राज ठाकरे स्टेजवर येत असताना कार्यकर्त्यांनीही स्टेजवर धाव घेतली. एकाच वेळी असंख्य कार्यकर्ते स्टेजवर आल्याने स्टेज कोसळलं. स्टेजचा मधला भाग अचानक खचल्याने त्यात काही महिला अडकल्या. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. मनसे कार्यकर्त्यांनी तातडीने या महिलांना बाहेर काढलं. […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 08:36 AM • 19 Feb 2022

follow google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते गोरेगावातील मनसे शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला. राज ठाकरे स्टेजवर येत असताना कार्यकर्त्यांनीही स्टेजवर धाव घेतली. एकाच वेळी असंख्य कार्यकर्ते स्टेजवर आल्याने स्टेज कोसळलं. स्टेजचा मधला भाग अचानक खचल्याने त्यात काही महिला अडकल्या. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. मनसे कार्यकर्त्यांनी तातडीने या महिलांना बाहेर काढलं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कुणालाही दुखापत झाली नाही. राज ठाकरे स्टेजच्या पुढे होते त्यामुळे त्यांना काहीही झालं नाही. ही घटना घडल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं आणि काळजी घ्या असं कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी कार्यक्रम सुरू ठेवला. यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले.

हे वाचलं का?

गोरेगाव येथे शाखा क्रमांक 40चं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. राज ठाकरे येणार असल्याने गोरेगावात हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी एक भव्य स्टेजही उभारण्यात आला होता. राज ठाकरे आल्यानंतर त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. राज यांनी शाखेचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते स्टेजवर चढले. स्टेजवर आल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना हात उंचावून नमस्कार केला. राज ठाकरे यांच्या मागोमाग असंख्य कार्यकर्तेही स्टेजवर चढले. महिला कार्यकर्त्याही स्टेजवर चढल्या. त्यामुळे स्टेजवर एकच गर्दी झाली आणि स्टेजचा मधला भाग अचानक कोसळला. त्यामुळे यात महिला अडकल्या गेल्या. पण मनसे कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेऊन या महिलांना बाहेर काढलं.