पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, उन्हाळ्यात 'या' भागांत पाणीपुरवठा राहणार बंद, सविस्तर वाचाच

Pune News : पुणेकरांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ऐन उन्हाळ्यात आता पुणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारित्या भागात दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या एकूण माहिती.

Pune News

Pune News

मुंबई तक

• 08:59 PM • 14 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

'या' ठिकाणी पाणीपुरवठा राहणार बंद 

point

कुठे आणि कधी? वाचाच

पुण्याची गोष्ट : पुणेकरांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ऐन उन्हाळ्यात आता पुणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारित्या भागात दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. पर्वती, होळकर पंपिंग, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि वडगाव येथे विद्यूत संबंधित प्रकरणी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे 16 एप्रिल 2026 रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आहे. तसेच शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेने माहिती दिली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : भाजप नेता असल्याचा दावा, 16 वर्षीय मुलीवर 19 वेळा लैंगिक अत्याचार अन्...

पुण्यात 'या' ठिकाणी पाणीपुरवठा राहणार बंद 

पर्वती जल केंद्राच्या अखत्यारित्या शहरातील सर्व पेठांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, मुकुंदनगर, पर्वतीनगर, सहकारनगर, सातारा रोड, डेक्कन परिसर, स्वारगेट, शिवाजीनगर, पर्वतीनगर, कात्रज, धनकवडी, तळजाई, इंदिरानगर, कर्वे रोड तसेच एसएनडीटी परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आहे. 

तसेच साईबाबानगर, सर्व्हे नंबर 42 आणि 46 कोंढवा खुर्द, पर्वती टँकर भरणा केंद्र, कोथरूड, एरंडवणा, आनंदनगर, हिंगणे, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, वडगाव धायरी, आंबेगाव धायरी, कोंढवा बुद्रूक, वडगाव जलकेंद्र परिसर हिंगणे, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वर नगर दत्तानगर येथे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

हे ही वाचा : अमरावतीत अश्लील व्हिडिओ कांड, 180 तरुणी आणि 350 'तसले' व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप, वातावरण तापलं

अशातच गुरुवारपासून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे पाण्याचा साठा साठवून ठेवण्याची अधिक गरज आहे, असे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंते नंदकिशोर जगताप यांनी माहिती दिली.