‘खोके पोहचले का?’, मोदी-शिंदे सरकारची ‘सामना’त जाहिरात, उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई तक

• 05:38 AM • 03 Nov 2022

एकनाथ शिंदेंचं बंड आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर बंडखोर आमदारांसह भाजप आणि मोदी सरकारवर ठाकरेंच्या ‘सामना’तून टीकेच्या तोफा डागल्या जात आहेत. पण, आता त्याच सामनात शिंदे-मोदींचे फोटो असलेली जाहिरात झळकलीये. सामनातली ही जाहिरात चर्चेचा विषय ठरली असून, मनसेनं लगेच यावरून उद्धव ठाकरेंना सामनात खोके पोहोचले का? असा टोला लगावलाय. एकनात शिंदेंसह ४० आमदारांसह बंड… त्यानंतर राज्यात […]

Mumbaitak
follow google news

एकनाथ शिंदेंचं बंड आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर बंडखोर आमदारांसह भाजप आणि मोदी सरकारवर ठाकरेंच्या ‘सामना’तून टीकेच्या तोफा डागल्या जात आहेत. पण, आता त्याच सामनात शिंदे-मोदींचे फोटो असलेली जाहिरात झळकलीये. सामनातली ही जाहिरात चर्चेचा विषय ठरली असून, मनसेनं लगेच यावरून उद्धव ठाकरेंना सामनात खोके पोहोचले का? असा टोला लगावलाय.

हे वाचलं का?

एकनात शिंदेंसह ४० आमदारांसह बंड… त्यानंतर राज्यात भाजपसोबत स्थापन केलेलं सरकार यावरून उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनातून शिंदे-फडणवीस आणि मोदी सरकारवर दररोज टीकेच्या फैरी झाडल्या जात असल्याचं बघायला मिळत आहे.

सातत्यानं शिंदे-मोदी सरकारच्या कारभारावर टीकेमुळे ‘सामना’ नेहमीच चर्चेत असतो, पण आता सामना चर्चेत आलाय, सरकारी जाहिरातीमुळे. अलिकडेच केंद्रातल्या मोदी सरकारने स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्तानं एका वर्षात ७५ हजार रोजगार देण्याची घोषणा केलीये. याची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार असून, त्यासंदर्भातील जाहिरात सर्व वर्तमानपत्रांना देण्यात आलीये.

७५ हजार रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प पहिल्या टप्यातील नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. दैनिक सामनाच्या पहिल्या पानावरही ही जाहिरात आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणाऱ्या सामनात सरकारची जाहिरात कशी, अशी चर्चा यामुळे सुरू झालीये.

‘राणा यांचा राम कोण?’; फडणवीसांचा उल्लेख, बच्चू कडूंना सल्ला, ‘सामना’त काय म्हटलंय?

सामनातील जाहिरातीवर मनसेनं काय म्हटलंय?

या चर्चेत मनसेनंही उडी घेतलीये. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत सामनाचा उल्लेख करत संपादक उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. संदीप देशपांडेंनी ट्विटमध्ये म्हटलंय की, “खोके’ सामनामध्ये पोहचले का?” असा सवाल करताना संदीप देशपांडेंनी सामनातील जाहिरातीचं पहिलं पानही पोस्ट केलंय.

एकीकडे मोदी-शिंदे सरकारवर सामनातून टीका होत असताना सरकारची जाहिरात सामनाच्या पहिल्या पानावर आलीये. ही जाहिरात सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. लोक वेगवेगळी मतं व्यक्त करत असून, या मुद्द्यावर शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून काय भूमिका मांडली जाणार हे बघावं लागेल.

    follow whatsapp