Mohit Kamboj :”भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंना प्रवेशासाठी 100 कॉल केले”

मुंबई तक

27 Feb 2023 (अपडेटेड: 22 Mar 2023, 10:31 PM)

Mohit Kamboj tweet । Bhaskar Jadhav Called To CM Eknath Shinde : ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांच्याबद्दल भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा कॉल केले, असा दावा मोहिमत कंबोज यांनी केला आहे. जून […]

Mumbaitak
follow google news

Mohit Kamboj tweet । Bhaskar Jadhav Called To CM Eknath Shinde : ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांच्याबद्दल भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा कॉल केले, असा दावा मोहिमत कंबोज यांनी केला आहे.

हे वाचलं का?

जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 16 आमदार आधी सुरतला गेले आणि त्यानंतर हळूहळू इतरही आमदार बंडखोर गटाला जाऊन मिळाले. त्यानंतर हे आमदार गुवाहाटीला गेले होते. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर आमदार भास्कर जाधवांनाही बंडखोर आमदारांच्या गटात जायचं होतं असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट करत भास्कर जाधवांबद्दल हा दावा केला आहे. त्यात त्यांनी गुवाहाटीच्या तिकीटाचा उल्लेख करत भास्कर जाधवांना एक प्रश्नही केला आहे.

Exclusive : ठाकरेंआधी शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला वार; गोऱ्हेंना दिलं पत्र

‘भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकीट बुक केलं होतं’, मोहित कंबोज यांचं ट्विट काय?

मोहित कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “भास्कर जाधव यांनी जून 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शंभर वेळा कॉल केले होते आणि बंडखोर आमदारांच्या गटात सामील होण्यासाठी भीक मागितली होती. जाधव विश्वासू नसल्यामुळे एकनाथ शिंदेंची त्यांना गटात घेण्याची इच्छा नव्हती. इतकंच नाही, तर जाधव यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी तिकीटही काढलं होतं. हे सत्य जाधव नाकारू शकतात का?”, असं मोहित कंबोज यांनी म्हटलेलं आहे.

भास्कर जाधवांची कोंडी, काय उत्तर देणार?

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव ह एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या खासदार, आमदारांवर सातत्यानं टीका करत आहेत. विधिमंडळातही भास्कर जाधव सातत्यानं एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना डिवचताना दिसतात. त्यातच आता मोहित कंबोज यांनी हा दावा करत एकप्रकारे भास्कर जाधवांची कोंडीच केली आहे, त्यामुळे जाधव काय उत्तर देणार हे महत्त्वाचं असणार आहे.

CM शिंदेंविरोधात ठाकरे अविश्वास प्रस्ताव आणणार; सरकार कोसळणार?

बंडानंतर मोहित कंबोज होते बंडखोर गटासोबत?

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे काही आमदार सुरतला गेले होते. सुरतमधून नंतर हे आमदार गुवाहाटीला गेले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत भाजपचेही काही लोक होते. यात मोहित कंबोज आणि आमदार संजय कुटे हेही होते.

    follow whatsapp