जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, ठाण्यात जाळपोळ; किरीट सोमय्यांनी काढलं जुनं प्रकरण

हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात मुक्काम कराव्या लागलेल्या आमदार जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत भर पडलीये. जितेंद्र आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणाचे पडसाद ठाण्यात उमटण्यास सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर टायर जाळण्यात आल्याच्या घटना समोर आल्यात. प्रकरणावर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनीही ट्विट करत आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल केलाय. कळवा-खाडी […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 03:53 AM • 14 Nov 2022

follow google news

हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात मुक्काम कराव्या लागलेल्या आमदार जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत भर पडलीये. जितेंद्र आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणाचे पडसाद ठाण्यात उमटण्यास सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर टायर जाळण्यात आल्याच्या घटना समोर आल्यात. प्रकरणावर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनीही ट्विट करत आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल केलाय.

हे वाचलं का?

कळवा-खाडी पुलाच्या उद्धघाटन कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाण्यात याचे पडसाद दिसून आले आहेत. ठाणे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त होऊ लागला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळण्यात आल्याचे प्रकार घडले असून, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचं दृश्य सकाळी पाहायला मिळालं.

पीडित महिला भाजप महिला मोर्चाची पदाधिकारी असून, महिलेनं केलेल्या आरोपानुसार जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने बाजूला केल्याची तक्रार आहे. या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची भूमिका घेतलीये. त्यामुळे प्रकरण तापण्याची चिन्हं दिसत आहे.

“मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय”, विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

जितेंद्र आव्हाडांविरुद्ध गुन्हा : किरीट सोमय्यांचं ट्विट

“जितेंद्र आव्हाड आज तथाकथित अन्यायाविरुद्ध ओरडत आहेत. अनंत करमुसे यांने आव्हाड यांच्या पोलीस गुंडांनी केलेले अपहरण, मारहाण, जीव घेण्याचा प्रयत्न, ह्या संबंधात आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस का गप्प आहेत?”, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी करमुसे प्रकरणाची आठवण आव्हाडांना करून दिलीये.

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करत भूमिका मांडलीये. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखविणाऱ्याविरुद्ध आवाज उठवला, तर 354 सारखा खोटा गुन्हा सुद्धा या राज्यात दाखल होऊ शकतो, याचे उदाहरण आव्हाड साहेबांच्या निमित्ताने पाहायला मिळालं .खुन्नस किती असावी? किती खालची पातळी गाठावी? हे यानिमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp