महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 147 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

• 03:24 PM • 07 Jul 2021

महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 899 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 58 लाख 81 हजार 167 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.5 टक्के एवढं झालं आहे. आज राज्यात 9 हजार 558 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 147 मृत्यूंची […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 899 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 58 लाख 81 हजार 167 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.5 टक्के एवढं झालं आहे. आज राज्यात 9 हजार 558 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 147 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 2.2 टक्क इतका झाला आहे.

हे वाचलं का?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 31 लाख 24 हजार 800 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 22 हजार 893 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 34 हजार 423 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 645 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 14 हजार 625 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 9 हजार 558 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या आता 61 लाख 22 हजार 93 इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण 147 मृत्यूंपैकी 98 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 49 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोव्हिड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 179 ने वाढली आहे. हे 179 मृत्यू, पुणे-61, पालघर-28, सांगली-19, लातूर-13, ठाणे-11, सातारा-9, नाशिक-7, अहमदनगर-5, औरंगाबाद-5, बुलढाणा-4, कोल्हापूर-3, सोलापूर-3, बीड-2, हिंगोली-2, रत्नागिरी-2, अकोला-1, अमरावती-1, जळगाव-1, नागपूर-1 आणि सिंधुदुर्ग-1 असे आहेत.

10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्णसंख्या असणारे जिल्हे

मुंबई – 12 हजार 255

ठाणे – 16 हजार 657

पुणे- 17 हजार 708

सांगली- 10 हजार 657

कोल्हापूर- 12 हजार 902

महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, पुणे, ठाणे आणि मुंबई या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या 10 हजारांपेक्षा जास्त आहे. कोरोना रूग्णांची संख्या एकीकडे आटोक्यात येत आहे असं वाटत असलं तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे आता राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

    follow whatsapp