महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील ९६० वर्ष जुनं असलेलं पुरतान शिवमंदीर आज खास आकर्षक रोषणाईने सजवण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे प्रकार टाळण्यासाठी सलग तिसऱ्या वर्षातही भाविकांना दर्शनाची परवानगी नाकारण्यात आली आहे. आज पहाटे रुद्राभिषेक करुन महाशिवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली.
ADVERTISEMENT
अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. ही यात्रा महाशिवरात्रीला भरणारी महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा असते. कारण आजुबाजूच्या परिसरातून अंदाजे ५ ते ६ लाख भाविक या एका दिवशी अंबरनाथ शिवमंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र मागील २ वर्षांपासून कोरोनामुळं ही यात्रा झालेली नाही. अंबरनाथ नगरपालिकेत शिवमंदिराचे परंपरागत पुजारी असलेले पाटील कुटुंबीय, अंबरनाथ पालिका प्रशासन आणि पोलीस यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत गर्दी होऊ नये, यासाठी पुजारी पाटील परिवारानं स्वतःहून यावर्षी सुद्धा महाशिवरात्रीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
रात्री १२ वाजता शिवमंदिरात रुद्राभिषेक आणि महाआरती करण्यात आली. महाशिवरात्री निमित्त मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात प्रवेश बंदी असल्याने शिवलिंगाचे दर्शन घेता येणार नाही, त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये अशी विनंती मंदिर पुजाऱ्याकडुन करण्यात आली आहे.
विठूचा देव्हारा सजला! महाशिवरात्रीनिमित्त बेल पानांची खास सजावट
ADVERTISEMENT
