मुलीने ठेवलेल्या WhatsApp स्टेट्समुळे आईला गमवावा लागला जीव

बोईसर: एका कॉलेजवयीन मुलीने WhatsApp वर स्टेट्सच्या ठेवल्याच्या वादातून पालघरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली. ज्यामध्ये मुलीच्या 48 वर्षीय आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोईसर मधील शिवाजीनगर येथे ही घटना घडली असून याप्रकरणी आता पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दोन गटामध्ये झालेल्या हाणामारीत लीलावती देवी प्रसाद या 48 […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:20 AM • 13 Feb 2022

follow google news

बोईसर: एका कॉलेजवयीन मुलीने WhatsApp वर स्टेट्सच्या ठेवल्याच्या वादातून पालघरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली. ज्यामध्ये मुलीच्या 48 वर्षीय आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोईसर मधील शिवाजीनगर येथे ही घटना घडली असून याप्रकरणी आता पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

दोन गटामध्ये झालेल्या हाणामारीत लीलावती देवी प्रसाद या 48 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्रीती प्रसाद नावाच्या एका मुलीने WhatsApp वर काही स्टेटस ठेवले होते. ज्यावरुन दुसऱ्या मुलीला त्याचा प्रचंड राग आला. तिने त्याबाबत काही मुलांना सांगितलं. ज्यानंतर दोन तरुणांनी प्रीती प्रसादला गाठून तिच्यासोबत वाद घातला. त्यामुळे प्रीतीने थेट पोलीस स्टेशन गाठलं. पण संबंधित तरुणांवर कोणतीही कारवाई न करता पोलिसांनी त्यांना सोडून दिल्याचा दावा प्रीतीने केला आहे.

दरम्यान, यानंतर त्याच दोन तरुणांसह तब्बल 7-8 जण हे थेट प्रीती राहत असलेल्या बोईसरमधील शिवाजीनगर येथील नवीन वस्तीमध्ये आले. जिथे सुरुवातीला त्यांच्यात प्रचंड भांडण झालं आणि त्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली. यावेळी सर्वांनी प्रीतीच्या आईला आणि तिच्या कुटुंबातील इतरांना बेदम मारहाण केली.

या सगळ्या मारहाणीमुळे प्रीतीची आई लीलावती देवी ही गंभीररित्या जखमी झाली. त्यामुळे तिला तात्काळ तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

प्रीतीने नेमका काय आरोप केला?

‘मी व्हॉट्सअॅपवर एक स्टेट्स ठेवलं होतं. व्हॉट्सअॅप हे सोशल मीडिया आहे. जर एखाद्याचं नाव नसेल तर त्याला कोणीही पर्सनली घेऊ शकत नाही. मी स्टेट्स ठेवलं तर एका मुलीने ते खूपच पर्सनली घेतलं. खरं तर त्या स्टेट्समध्ये कोणतीही चुकीची गोष्ट नव्हती. यानंतर दोन जण माझ्या इथे आले आणि त्यांनी माझ्याशी भांडण केलं.’

‘दोघांनी मला मारहाण देखील केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा घरी येऊन माझ्याशी भांडण केलं. मी पोलिसात देखील गेले होते. पण याबाबत काही कारवाई झाली नाही. त्यांनी दोघांनाही सोडून दिलं. त्यानंतर दोघांनी परत येऊन मला आणि माझ्या आईसह संपूर्ण कुटुंबीयांना मारहाण केली. यावेळी सात ते आठ जण आले होते. रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान हे सगळे आले होते.’

‘माझ्या आईला या सगळ्यांनी बेदम मारहाण केली. अक्षरश: दगडाने त्यांनी तिचं डोकं ठेचलं. तिला त्यांनी प्रचंड मारलं त्यामुळेच माझ्या आईचा मृत्यू झाला.’ असा आरोप प्रीती प्रसाद हिने केला आहे.

कोल्हापुरात दोन गटात तुफान हाणामारी, महिलांवरही तलवारीने हल्ला

दरम्यान, या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा दावा पोलिसांनी केला आहे.

फक्त WhatsApp स्टेटस वरून झालेल्या भांडणांमध्ये एका महिलेला जीव गमवावा लागणं ही खरोखरीच गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.

    follow whatsapp