दिलासादायक ! मुंबईत Corona बाधितांची संख्या १ हजारापेक्षा कमी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या मुंबई आणि राज्यात आता रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या १ हजाराच्या खाली आली आहे. सोमवारी मुंबईत ९६० कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मुंबईत सोमवारी १ हजार ८३७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून सध्याच्या घडीला ९ हजार ९०० सक्रीय रुग्ण आहेत. #CoronavirusUpdates31st January, 6:00pm#NaToCorona […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:33 PM • 31 Jan 2022

follow google news

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या मुंबई आणि राज्यात आता रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या १ हजाराच्या खाली आली आहे. सोमवारी मुंबईत ९६० कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

हे वाचलं का?

मुंबईत सोमवारी १ हजार ८३७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून सध्याच्या घडीला ९ हजार ९०० सक्रीय रुग्ण आहेत.

मुंबईत सोमवारी ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर येऊन पोहचला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासूनची कोरोना रुग्णसंख्येची कमी होणारी आकडेवारी पाहता लाटेवर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश आलं आहे असं म्हणता येईल.

मुंबईत गेल्या काही दिवसांमधला कोरोना रुग्णसंख्येचा उतरता आलेख –

  • १५ जानेवारी – १० हजार ६६१ रुग्ण

  • १६ जानेवारी – ७ हजार ८९५ रुग्ण

  • १७ जानेवारी – ५ हजार ९५६ रुग्ण

  • १८ जानेवारी – ६ हजार १४९ रुग्ण

  • १९ जानेवारी – ६ हजार ०३२ रुग्ण

  • २० जानेवारी – ५ हजार ७०८ रुग्ण

  • २१ जानेवारी – ४ हजार ००८ रुग्ण

  • २२ जानेवारी – ३ हजार ५६८ रुग्ण

  • २३ जानेवारी – २ हजार २५० रुग्ण

  • २४ जानेवारी – १ हजार ८५७ रुग्ण

  • २५ जानेवारी – १ हजार ८१५ रुग्ण

  • २६ जानेवारी – १ हजार ८५८ रुग्ण

  • २७ जानेवारी – १ हजार ३८४ रुग्ण

  • २८ जानेवारी – १ हजार ३१२ रुग्ण

  • २९ जानेवारी – १ हजार ४११ रुग्ण

  • ३० जानेवारी – १ हजार १६० रुग्ण

  • ३१ जानेवारी – ९६० रुग्ण

सध्या मुंबईत कोरोनाच्या संसर्गामुळे ६ इमारती सिल करण्यात आल्या आहेत. याचसोबत आज नव्याने सापडण्यात आलेल्या ९६० रुग्णांपैकी १०६ जणांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महापालिकेकडे सध्या ३७ हजार ५७६ बेड्सपैकी २ हजार २१५ बेड वापरात आहेत.

    follow whatsapp