Uddhav Thackeray: माझ्या माणसांनीच मला दगा दिला,काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांचे आभार

मुंबई तक

• 02:04 PM • 29 Jun 2022

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरेंनी मंगळवार आणि बुधवार या दोन दिवस कॅबिनेट बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली होती. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांचे आभार मानले तसंच माझ्याच लोकांनी मला दगा दिला असं यावेळी उद्धव ठाकरे […]

Mumbaitak
follow google news

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरेंनी मंगळवार आणि बुधवार या दोन दिवस कॅबिनेट बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली होती. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांचे आभार मानले तसंच माझ्याच लोकांनी मला दगा दिला असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय भूकंपानंतर दोनदा राजीनामा देणार होते पण पवारांनी थांबवलं

ज्या मंत्र्यांच्या खात्यांचे विषय राहिले आहेत ते आपण पुढच्या कॅबिनेटमध्ये घेऊ. तसंच कुणी दुखावलं असेल तर मला माफ करा, अडीच वर्षे जे सहकार्य केलं त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच राज्यात जी परिस्थिती आत्ता निर्माण झाली आहे ती माझ्याच लोकांनी मला दगा दिल्याने निर्माण झाली आहे असंही वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

फ्लोअर टेस्टवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष; महाराष्ट्राच्या लढ्यात पुढे काय?

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॅबिनेटच्या बैठकीत औऱंगाबादचं नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडतील त्या प्रस्तावाला विरोध होईल त्यानंतर ते राजीनामा देतील ही चर्चा होती. मात्र या औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर तसंच उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्याचा प्रस्ताव या बैठकीत मान्य झाला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जे आभाराचं भाषण केलं त्यात त्यांनी माझ्याच लोकांनी मला दगा दिला असे उद्गार काढले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातले दोन निर्णय महत्त्वाचे आहेत. पहिला निर्णय हा औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय घेतला गेलाय. सत्ता नाट्याच्या पार्श्वभूमीवर हे दोन निर्णय महत्त्वाचे मानले जात आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात काय सांगितलं हे जयंत पाटील यांनीही माध्यमांना सांगितलं. जयंत पाटील यांनी स्पष्ट केल की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध विचारांच्या तीन पक्षांना सोबत घेत काम केलं. त्याबद्दल त्यांनी आम्हा सहकारी पक्षातल्या लोकांचे आभार मानले.

    follow whatsapp