Video:कट्यारनंतर पुन्हा एकत्र येणार सुबोध आणि शंकर महादेवन

कट्यार काळजात घुसली हा सिनेमा आजही ओळखला जातो तो सुबोध भावेच्या अप्रतिम अदाकारीसाठी आणि शंकर महादेवन यांच्या अद्भुत सुरांसाठी. या सिनेमाने सुबोध भावेने मराठीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. तर शंकर महादेवन यांनीही यात अप्रतिम भूमिका साकारली होती. शंकर,एहसान,लॉय या संगीतकार त्रयीचं सुमुधर संगीतही प्रचंड गाजलं होतं. आता हिच हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र येतेय. सुबोधने […]

Mumbai Tak

Abhinn Kumar

28 Jan 2021 (अपडेटेड: 29 Mar 2023, 11:18 PM)

follow google news

कट्यार काळजात घुसली हा सिनेमा आजही ओळखला जातो तो सुबोध भावेच्या अप्रतिम अदाकारीसाठी आणि शंकर महादेवन यांच्या अद्भुत सुरांसाठी. या सिनेमाने सुबोध भावेने मराठीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. तर शंकर महादेवन यांनीही यात अप्रतिम भूमिका साकारली होती. शंकर,एहसान,लॉय या संगीतकार त्रयीचं सुमुधर संगीतही प्रचंड गाजलं होतं. आता हिच हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र येतेय. सुबोधने मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत याची घोषणा केली. २०२२ साली सुबोध आणि शंकर महादेवन ही जोड़ी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एक म्युझिकल सिनेमा घेऊन येतायत.

हे वाचलं का?

सध्या सुबोध भावेची कलर्स मराठीवर चंद्र आहे साक्षीला ही नवीन मालिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे. यातील सुबोध साकारत असलेलं श्रीधर काळे ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजत आहे. नुकतंच या मालिकेचे ५० भाग पूर्ण झाले. सुबोध या मालिकेत नकारात्मक भूमिकेत आहे. मात्र नकारात्मक भूमिका जरी असली तरी सुबोधची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. त्याचबरोबक शुभमंगल अॉनलाईन ही कलर्स मराठीवरची मालिकेची निर्मितीही सुबोध भावे करतोय. त्याच्या कान्हाज मँजिक या निर्मिती संस्थेतर्फे ही मालिका सादर करण्यात येत आहे.

सुबोध भावे याच बरोबर एका एेतिहासिक सिनेमाचीही तयारी करत आहे. अजून ही भूमिका कुठली याबद्दल कोणतीही माहिती सुबोध भावेने दिलेली नसली. तरी सध्या सुबोध भावे या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतोय. नुकतंच सोशल मिडीयावर सुबोधने तो घोडेस्वारी करत असतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामुळे सुबोध भावे एक नवीन बायोपिकची तयारी करतोय अशी जोरदार चर्चा होती. याबद्दल मुंबई तकने सुबोधला याबाबत विचारलं असता हो मी एका बायोपिकची तयारी करत असून लवकरच याबद्दल मी घोषणा करेन असं त्य़ाने सांगितलं.

    follow whatsapp