सोन्याच्या बिस्कीटासह रोख रक्कम घेऊन प्रवास करणारा संशयित नागपूर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

नागपूर रेल्वे पोलिसांच्या पथकाने एका इसमाला संशयाच्या आधारावर अटक केली आहे. चौकशीदरम्यान या इसमाकडे १०० ग्रॅम वजनाचं सोन्याचं बिस्कीट आणि २ लाख ६३ हजार रुपये रोखरक्कम आढळून आली आहे. या आरोपीने आपलं नाव रमेश सिंग (बदललेलं नाव) असं सांगितलं आहे. हा आरोपी सैन्यात कार्यरत असल्याची बतावणी करत असल्याचं नागपूर पोलिसांनी सांगितलं. परंतू सोन्याचं बिस्कीट आणि […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:07 AM • 10 Jan 2022

follow google news

नागपूर रेल्वे पोलिसांच्या पथकाने एका इसमाला संशयाच्या आधारावर अटक केली आहे. चौकशीदरम्यान या इसमाकडे १०० ग्रॅम वजनाचं सोन्याचं बिस्कीट आणि २ लाख ६३ हजार रुपये रोखरक्कम आढळून आली आहे. या आरोपीने आपलं नाव रमेश सिंग (बदललेलं नाव) असं सांगितलं आहे. हा आरोपी सैन्यात कार्यरत असल्याची बतावणी करत असल्याचं नागपूर पोलिसांनी सांगितलं. परंतू सोन्याचं बिस्कीट आणि रोख रक्कम कुठून आणली य़ाची समाधानकारक उत्तरं न दिल्यामुळे पोलिसांनी हा मुद्देमाल आयकर विभागाच्या ताब्यात दिला असून आरोपीला अटक केली आहे.

हे वाचलं का?

नागपूर रेल्वे पोलिसांना , ट्रेन नंबर २०८०५ विशाखापट्टनम – नवी दिल्ली एक्सप्रेसमध्ये एक संशयास्पद इसम प्रवास करत असल्याचं समजलं होतं. ही माहिती मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर जाळ विणून ठेवलं होतं. हा संशयित आरोपी स्टेशनवर उतरताच पोलिसांनी त्याच्याकडे चौकशीला सुरुवात केली. यावेळी या इसमाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. यावेळी नागपूर पोलिसांना या व्यक्तीवरचा संशय अधिकच बळावला.

यावेळी घेतलेल्या झाडाझडतीत पोलिसांनी या इसमाकडे १०० ग्रॅम वजनाचं सोन्याचं बिस्कीट आणि २ लाख ६३ हजार रोख रक्कम असा ७ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल सापडला.

नागपूर पोलिसांना हा संशयित आरोपी लाल बॅग घेऊन प्रवास करत असल्याचं कळलं होतं. या माहितीच्या आधारावर चौकशी करत असताना पोलिसांना या इसमाकडे मुद्देमाल सापडून आला. हा सर्व माल आयकर विभागाकडे सोपवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्यांविरुद्ध नागपूर पोलिसांची कारवाई, १६ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

    follow whatsapp