राज ठाकरेंना धक्का, नितेश राणेंनी खास माणूस फोडला, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष धुरींची पहिली प्रतिक्रिया

Santosh Dhuri has left Raj Thackeray MNS side : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. भाजप नेते नितेश राणे यांनी मनसेतील हा ‘खास माणूस’ फोडल्याची चर्चा रंगली असून, या घडामोडीमुळे मनसेतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

Santosh Dhuri has left  Raj Thackeray MNS side

Santosh Dhuri has left Raj Thackeray MNS side

मुंबई तक

06 Jan 2026 (अपडेटेड: 06 Jan 2026, 10:08 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंना धक्का, नितेश राणेंनी खास माणूस फोडला

point

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष धुरींची पहिली प्रतिक्रिया

Santosh Dhuri has left  Raj Thackeray MNS side :मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. भाजप नेते नितेश राणे यांनी मनसेतील हा ‘खास माणूस’ फोडल्याची चर्चा रंगली असून, या घडामोडीमुळे मनसेतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

हे वाचलं का?

ठाकरेंना जागा सुटल्याने सुरेश धुरी नाराज, थेट भाजप प्रवेशाचा निर्णय

संतोष धुरी हे वॉर्ड क्रमांक 194 मधून मनसेकडून इच्छूक उमेदवार होते. मात्र, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील जागावाटपात हा वॉर्ड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्यामुळे धुरी यांचे तिकीट कापले गेले. याच वॉर्डमध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या विरोधात निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आल्याने धुरी अधिकच नाराज झाले होते. अनेक वर्षे पक्षासाठी काम करूनही आपल्याला डावलले गेल्याची भावना त्यांच्या मनात होती.

याच पार्श्वभूमीवर संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर आज ते अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या राजकीय हालचालींमागे नितेश राणेंची महत्त्वाची भूमिका असल्याचंही बोललं जात आहे. मनसेच्या एका जुन्या चेहऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा : महिला IAS अधिकाऱ्याच्या घरात सुरु होतं सेक्स रॅकेट, 4 मुली अन् 5 मुलं नको त्या अवस्थेत सापडल्याने खळबळ

राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सुरेश धुरींची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना संतोष धुरी यांनी एका वाक्यात विषय मिटवला. "मनसेत माझी कदर करण्यात आली नाही", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीये. संतोष धुरी हे राज ठाकरे यांच्या मनसेतील माजी नगरसेवक असून, एकेकाळी राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. दादर परिसरात मनसेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक वर्षे रस्त्यावर उतरून, आंदोलनांपासून स्थानिक प्रश्नांपर्यंत ते सक्रिय होते. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा वॉर्ड क्रमांक 194 मधून रिंगणात उतरण्यास इच्छुक होते. या उमेदवारीसाठी मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही जोरदार प्रयत्न केले होते. तरीही शिवसेना-मनसे यांच्यातील जागावाटपात हा वॉर्ड उद्धव ठाकरे गटाला गेल्याने धुरी यांची संधी हुकली. अनेक वर्षांची पक्षनिष्ठा असूनही संधी न मिळाल्याने अखेर त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारल्याचं चित्र आहे. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संतोष धुरी कोणती भूमिका बजावतात आणि दादर परिसरातील राजकीय समीकरणं कशी बदलतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

महिला IAS अधिकाऱ्याच्या घरात सुरु होतं सेक्स रॅकेट, 4 मुली अन् 5 मुलं नको त्या अवस्थेत सापडल्याने खळबळ

    follow whatsapp