Amit Deshmukh on Ravindra Chavan,लातूर : "खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येतंय की, विलासराव देशमुखांच्या आठवणी लातरमधून 100 टक्के पुसल्या जातील. यात काही शंका नाही", असं वक्तव भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं. लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा लातूर जिल्हा यांच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून देखील संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, आता याबाबत आमदार आणि विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित देशमुख काय म्हणाले? जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुण्याच्या राजकारणातील 'पॉवर हाऊस' काळाच्या पडद्याआड, सुरेश कलमाडी यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन
अमित देशमुख म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन जे विधान केलंय त्यावरून, हा पक्ष कुठल्या स्तरावर राजकारनाला घेऊन चालला आहे हे दिसून येत आहे. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. त्यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातूनही असाच निषेध होताना दिसत आहे...विद्यमान राज्य सरकारच्या कार्यकाळात निवडणुकीच्या दरम्यान लोकांना धमकावणे, पैशाचे अमिष दाखवणे, एवढेच नव्हे तर उमेदवार पळवणे, त्यांच्या अपहरण करणे, खून , हिंसाचार घडवणे इथपर्यंतच्या घटना घडत आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी ओळख कधीच नव्हती, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राची ही नवी ओळख निर्माण करू पाहतो आहे का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे...
पुढे बोलताना देशमुख म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या संदर्भाने जे विधान केलंय, ते अत्यंत दुर्दैवी दुःखदायक आहे, त्यांच्याकडून आणि भारतीय जनता पक्षा कडूनही अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती, त्यांच्या या वक्तव्यामुळे आम्हा सर्व लातूरकरांची मने दुखावली आहेत. आम्ही त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहोत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











