पुण्याच्या राजकारणातील 'पॉवर हाऊस' काळाच्या पडद्याआड, सुरेश कलमाडी यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन
Suresh Kalmadi Passed away : केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवले होते. पुण्याच्या राजकारणात त्यांचा दीर्घकाळ दबदबा राहिला. पक्षाच्या चौकटीबाहेरही त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. याच जनाधाराच्या जोरावर कलमाडी सलग 2 वेळा पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्याच्या राजकारणातील 'पॉवर हाऊस' काळाच्या पडद्याआड
सुरेश कलमाडी यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन
Suresh Kalmadi Passed away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज (6 जानेवारी) पहाटे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणातील एक प्रभावी पर्व संपुष्टात आले आहे. कलमाडी यांचे पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. "कधी काळी पुणे म्हणजे कलमाडी आणि कलमाडी म्हणजे पुणे", असं म्हणावं, इतका त्यांचा पुण्यातील राजकारणात दबदबा होता.
पुण्याच्या राजकारणात दबदबा, सलग 10 वर्ष होते खासदार
केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवले होते. पुण्याच्या राजकारणात त्यांचा दीर्घकाळ दबदबा राहिला. पक्षाच्या चौकटीबाहेरही त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. याच जनाधाराच्या जोरावर कलमाडी सलग 3 वेळा पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. एकेकाळी पुण्याच्या राजकारणावर त्यांची पकड मजबूत होती आणि स्थानिक राजकारणातील ते एक प्रभावी नेतृत्व मानले जात होते.
मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांतील घोटाळ्याच्या आरोपांमुळे सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला. 2010 मध्ये झालेल्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप त्यांच्यावर झाले होते. आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना झालेल्या कथित गैरव्यवहारांमुळे त्यांना अटकही करण्यात आली होती. या प्रकरणामुळे त्यांची राजकीय वाटचाल उतरणीला लागली.










