रवींद्र चव्हाण म्हणाले, लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, रितेश देशमुखची 3 वाक्यात भावुक प्रतिक्रिया

Riteish Deshmukh on Ravindra Chavan : "खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येतंय की, विलासराव देशमुखांच्या आठवणी लातरमधून 100 टक्के पुसल्या जातील. यात काही शंका नाही", असं रवींद्र चव्हाण म्हणाले होते. दरम्यान, आता अभिनेता आणि विलासराव देशमुख यांचा पुत्र रितेश देशमुख याने रवींद्र चव्हाण यांना 3 वाक्यात प्रत्युत्तर दिलंय. रितेश देशमुख नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात...

Riteish Deshmukh

Riteish Deshmukh

मुंबई तक

06 Jan 2026 (अपडेटेड: 06 Jan 2026, 01:54 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रवींद्र चव्हाण म्हणाले, लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील

point

रितेश देशमुखची 3 वाक्यात भावूक प्रतिक्रिया

Riteish Deshmukh on Ravindra Chavan : लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये भाजपच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राज्यभरातील काँग्रेस नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. "खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येतंय की, विलासराव देशमुखांच्या आठवणी लातरमधून 100 टक्के पुसल्या जातील. यात काही शंका नाही", असं रवींद्र चव्हाण म्हणाले होते. दरम्यान, आता अभिनेता आणि विलासराव देशमुख यांचा पुत्र रितेश देशमुख याने रवींद्र चव्हाण यांना 3 वाक्यात प्रत्युत्तर दिलंय. रितेश देशमुख नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात...

हे वाचलं का?

रितेश देशमुख म्हणाला, दोन्ही हात वर करुन सांगतो. "लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही...जय महाराष्ट्र...", अशी प्रतिक्रिया अभिनेता रितेश देखमुख याने दिली आहे. 

हेही वाचा : राज ठाकरेंना धक्का, नितेश राणेंनी खास माणूस फोडला, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष धुरींची पहिली प्रतिक्रिया

अमित देशमुख यांची प्रतिक्रिया

दरम्यान, रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत बोलताना अमित देशमुख म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन जे विधान केलंय त्यावरून, हा पक्ष कुठल्या स्तरावर राजकारनाला घेऊन चालला आहे हे दिसून येत आहे. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. त्यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातूनही असाच निषेध होताना दिसत आहे... विद्यमान राज्य सरकारच्या कार्यकाळात निवडणुकीच्या दरम्यान लोकांना धमकावणे, पैशाचे अमिष दाखवणे, एवढेच नव्हे तर उमेदवार पळवणे, त्यांच्या अपहरण करणे, खून , हिंसाचार घडवणे इथपर्यंतच्या घटना घडत आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी ओळख कधीच नव्हती, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राची ही नवी ओळख निर्माण करू पाहतो आहे का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

बाळासाहेब थोरात म्हणाले, विलासरावजी हे केवळ लातूरचे सुपुत्र नव्हते, तर आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचे शिल्पकार होते. गाव खेड्यांपासून ते झगमगत्या महानगरांपर्यंत, त्यांच्या कार्याच्या पाऊलखुणा आजही ठळकपणे उमटलेल्या दिसतात. मूल्यधिष्ठित आणि सुसंस्कृत राजकारणाचा एक आदर्श वारसा त्यांनी महाराष्ट्राला दिला. त्यांच्या आठवणी पुसण्याचे कितीही प्रयत्न झाले, तरी त्या जनमाणसांच्या मनात अधिकच ठसठशीत आणि अढळ होत जातील. जनतेच्या मनात अढळस्थान निर्माण केलेल्या नेत्याच्या स्मृती पुसून टाकण्याची भाषा, ही भारतीय जनता पक्षाच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पुणे: "माझ्या वडिलांची प्रकृती गंभीर..." इमर्जन्सी कॉलच्या बहाण्याने डॉक्टरांना बोलवलं अन् आरोपींचं भयंकर कृत्य!

    follow whatsapp