नांदेड : धुळवडीच्या दिवशी गोळीबार करणाऱ्या चौघांना अटक

मुंबई तक

• 09:03 AM • 23 Mar 2022

नांदेड शहरात धुळवडीच्या सणाच्या वेळी माळटेकडी उड्डाणपुलाच्या समोर दिपक बिगानिया या तरुणावर काही तरुणांनी गोळीबार केला होता. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ माजली होती. या गोळीबार करणाऱ्या तरुणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दिपक बिगानीया या हल्ल्यात गोळी लागल्यामुळे जखमी झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्र वेगाने फिरवत चार आरोपींना अटक केली […]

Mumbai Tak
Google CTA

नांदेड शहरात धुळवडीच्या सणाच्या वेळी माळटेकडी उड्डाणपुलाच्या समोर दिपक बिगानिया या तरुणावर काही तरुणांनी गोळीबार केला होता. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ माजली होती. या गोळीबार करणाऱ्या तरुणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दिपक बिगानीया या हल्ल्यात गोळी लागल्यामुळे जखमी झाला आहे.

हे वाचलं का?

या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्र वेगाने फिरवत चार आरोपींना अटक केली आहे. हे चारही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांना विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं आहे. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा आढावा घेत आरोपींना पकडण्यासाठी पथकांची स्थापना केली होती.

क्रुरतेचा कळस ! दोन महिन्याच्या मुलीची आईकडून हत्या, ओव्हनमध्ये मिळाला मृतदेह

प्राथमिक तपासात दिपक बिगानियावर हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचं समोर आलं. मागील दोन दिवसांपासून पोलीस या आरोपींच्या शोधात होते. बोंढार बायपासवर गाडेगाव येथे हे आरोपी लपून बसल्याचं पोलिसांना समजलं. ज्यानंतर या भागात पोलिसांनी छापेमारी केली असता आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतू या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इश्वरसिंग गाडीवाले, राधेश्याम कुंडगीर, कुलविंदरसिंह महाजन आणि गणपतीसिंग मठवाले अशी या आरोपींची नाव असून पोलिसांनी चौघांवरही गुन्हा दाखल केला आहे.