दोन मुलं असताना विवाहबाह्य संबंध, पतीने पत्नीला चाकूने वार करुन संपवलं

मुंबई तक

05 Oct 2026 (अपडेटेड: 05 Oct 2026, 04:26 PM)

Delhi Crime News : दिल्लीतील पालम परिसरात पत्नीची चाकूने हत्या केल्याप्रकरणी 36 वर्षीय पतीला पोलिसांनी अटक केली. विवाहबाह्य संबंधाच्या आरोपावरून झालेल्या वादानंतर हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

Delhi Crime News

Delhi Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दोन मुलं असताना विवाहबाह्य संबंध

point

पतीने पत्नीला चाकूने वार करुन संपवलं

Delhi Crime News : दिल्लीतील पालम परिसरात पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याप्रकरणी 36 वर्षीय पतीला पोलिसांनी अटक केली आहे. विवाहबाह्य संबंधाच्या आरोपावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनिया (30) असं मृत पत्नीचे नाव असून प्रदीप असे आरोपी पतीचे नाव आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : दृश्यम 3 पाहून वडिलांची हत्या; 2 हजार किमी प्रवास, पत्नीला केलेल्या एका फोनमुळे आरोपी अडकला

सोनिया यांच्या छातीवर आणि मानेवर केले चाकूने वार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप हा बिर्याणीचा स्टॉल चालवतो. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 4.49 वाजता पालम येथील जे.जे. कॉलनीतील काली माता मंदिराजवळ चाकूने हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना पीसीआर कॉलद्वारे मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता सोनिया (30) या जखमी अवस्थेत आढळून आल्या. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांच्या तपासात सोनिया यांनी पती प्रदीपच्या कथित विवाहबाह्य संबंधाबाबत त्याच्याकडे जाब विचारल्याचे समोर आले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद वाढल्यानंतर प्रदीपने सोनिया यांच्या छातीवर आणि मानेवर चाकूने अनेक वार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : विवाहबाह्य प्रकरणाबाबत बायकोनं नवऱ्याला विचारला जाब, पतीने धारदार शस्त्राने संपवलं

प्रदीपने गुन्ह्यात सहभाग असल्याची दिली कबुली 

या प्रकरणी प्रत्यक्षदर्शीच्या जबाबावरून पालम व्हिलेज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर प्रदीप फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने तांत्रिक तसेच प्रत्यक्ष पाळत ठेवण्याच्या माध्यमातून तपास सुरू केला. 2 ऑक्टोबर रोजी पोलिसांना प्रदीपच्या ठिकाणाबाबत ठोस माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली. द्वारका सेक्टर 20 परिसरात प्रदीपला अडवून त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान प्रदीपने गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रदीप आणि सोनिया यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. मागील काही काळापासून दोघांच्या वैवाहिक नात्यात तणाव होता. विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांवरून आणि संशयावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी असलेला प्रदीप बिर्याणीचा छोटा स्टॉल चालवण्यासोबत ढोल वाजवण्याचेही काम करत होता. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार जप्त करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. तसेच घटनेचा संपूर्ण क्रम तपासला जात आहे.