उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदी निवड होण्याआधी ‘त्या’ रात्री काय घडलं?; राणेंनी केला नवा दावा

मुंबई तक

• 04:21 AM • 21 Oct 2021

शिवसेनेच्या दसरा मेळाव्या मुख्यमंत्री तथा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल भाष्य केलं होतं. ‘मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, तुम्हीच मुख्यमंत्री झाला असता’, असं म्हणत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्रीपदाबद्दल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांची घरी जाऊन भेट घेतल्याचा दावा करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. केंद्रीय […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेच्या दसरा मेळाव्या मुख्यमंत्री तथा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल भाष्य केलं होतं. ‘मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, तुम्हीच मुख्यमंत्री झाला असता’, असं म्हणत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्रीपदाबद्दल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांची घरी जाऊन भेट घेतल्याचा दावा करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

हे वाचलं का?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘प्रहार’मध्ये ‘हार आणि प्रहार’ लिहिलेल्या लेखातून खळबळजनक दावे करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “हे म्हणतात, मला शरद पवार यांनी मुख्यमंत्री केले. आम्हाला माहिती आहे, कसे केले ते! शिवसैनिक साक्षीदार आहेत. संजय राऊत जी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री आपण उद्धव ठाकरे व आदित्यना घेऊन शरद पवार साहेबांच्या घरी पोहोचलात. त्यावेळी तुमच्यासोबत एकनाथ शिंदे किंवा अन्य कोणी शिवसैनिक नव्हता.”

“आपण तिघे शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की, ‘साहेब, आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करावयाचे होते, पण काही कारणामुळे ते शक्य नाही. आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहे.’ याला राऊत साहेबांनी दुजोरा दिला. त्यानंतर शरद पवार साहेब म्हणाले, ‘वा! हे उत्तमच झाले! मी उद्याच्या बैठकीत हे जाहीर करतो.’ त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या बैठकीमध्ये शरद पवार साहेबांनी आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर केले.”

“आपण मांजरीप्रमाणे डोळे मिटून दूध पिण्याचे सोडा. शिवसेना आता वाघ राहिलेली नाही. तिची मांजर, शेळी झाली आहे. भारतीय जनता पक्ष देशभर आहे. तुम्ही फक्त महाराष्ट्रात आणि तेही ५६. आयत्या बिळावरचे नागोबा. भाजप महाराष्ट्रात १०६ आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा १४५. भारतीय जनता पक्षाबाबत आणि आमच्या नेत्यांबाबत ही भाषा आपण वापराल आणि बदनामी कराल, तर तुम्ही जे पेरता तेच उगवेल, हे लक्षात ठेवा आणि त्यावेळी काय होईल, याची कल्पना करा. जीभ संयमात ठेवा, जिभेचा सैरावैरा वापर करू नका”, असा इशारा राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

…अन्यथा बाळासाहेबांना कसं छळलं, ते सांगावं लागेल; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर ‘प्रहार’

किती ही बनवाबनवी???

“मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा! हिंदू तितुका मेळवावा!! हिंदुस्थान धर्म वाढवावा!!!’ किती हा बोगसपणा? किती हा खोटारडेपणा?? किती ही बनवाबनवी??? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळविलेले मुख्यमंत्री पद!!’, असं टीकास्त्र राणे यांनी डागलं आहे.

    follow whatsapp