शिवसेनेच्या माजी नगरसेविकेकडून शिवसेना विभाग प्रमुखालाच मारहाण, घटना CCTV मध्ये कैद

निलेश पाटील, नवी मुंबई: शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्याच विभाग प्रमुखाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची सध्या नवी मुंबईत बरीच चर्चा सुरु आहे. दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेजच्या लोकार्पण सोहळ्याला भाजपाच्या व्यासपीठावरील उपस्थिती आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्कार स्वीकारतानाचे व्हीडिओ बेलापूर विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांनी वरिष्ठांना […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:48 AM • 04 Apr 2022

follow google news

निलेश पाटील, नवी मुंबई: शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्याच विभाग प्रमुखाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची सध्या नवी मुंबईत बरीच चर्चा सुरु आहे.

हे वाचलं का?

दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेजच्या लोकार्पण सोहळ्याला भाजपाच्या व्यासपीठावरील उपस्थिती आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्कार स्वीकारतानाचे व्हीडिओ बेलापूर विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांनी वरिष्ठांना पाठवले होते. याचा राग अनावर झाल्याने भारती कोळी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांना मारहाण केली असल्याचं आता समोर आलं आहे.

या घटने प्रकरणी शिवसेनेचे बेलापूर विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून एनआरआय पोलिसांनी माजी नगरसेविका भारती कोळी व त्यांच्या 8 समर्थकांवर मारहाण, शिवीगाळ करणे व धमकावणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजपच्या या कार्यक्रमाला आमदार गणेश नाईक हे सुद्धा उपस्थितीत होते. याच कार्यक्रमाला शिवसेनेच्या माजी नगरसेवक भारती कोळी या देखील हजर होत्या. भारती कोळी या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत. त्यामुळे त्यांनी थेट भाजपच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने नवी मुंबईतील शिवसैनिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं होतं. याच कार्यक्रमात भारती कोळी यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला होता.

दरम्यान, या सगळ्या प्रकाराची नवी मुंबईत चर्चा सुरु झाल्याने शिवसेनेचे विभागप्रमुख प्रकाश आमटे यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांना याबाबतची नेमकी माहिती कळवली.

संतापजनक! शिवसेना आमदाराकडून महिलेला रस्त्यावरच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

भारती कोळी ज्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या त्याच कार्यक्रमातील फोटो आणि व्हीडिओ प्रकाश आमटे यांनी वरिष्ठ नेत्यांना पाठवले होते. पण जेव्हा भारती कोळी यांना ही बाब समजली तेव्हा त्यांचा पार भलताच चढला आणि त्यांनी थेट आपल्या काही समर्थकांसह प्रकाश आमटे असलेल्या एका कार्यालयात धडक दिली.

यावेळी भारती कोळी यांनी सरळ प्रकाश आमटे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा इतर काही जणांनी देखील त्यांना शिविगाळ करत मारहाण केली. दरम्यान, हा सगळा प्रकार आता सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आता हा सगळा प्रकार उघडकीस आल्याने शिवसेना पक्ष भारती कोळी यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp