‘मुंबईत 1992 साली ज्यांनी मुंबईकरांच्या चिंधड्या उडवल्या त्यांच्यासोबत नवाब मलिक यांनी जमिनीचा व्यवहार केला आणि हा सगळा व्यवहार काळ्या पैशाचा आहे’, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (9 नोव्हेंबर) केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांनंतर नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं.
