राज कुंद्राचा साथीदार कुणाल जानीला ड्रग्ज केसमध्ये NCB कडून अटक

अंमलबजावणी प्रतिबंधक विभागाने (NCB) हॉटेल व्यावसायिक कुणाल जानीला अटक केली आहे. ड्रग्ज केसमध्ये कुणाल जानीला अटक करण्यात आली आहे. या आधी आगिसिल्स या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आगिसिल्स हा अभिनेता अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचा भाऊ आहे. आता त्यापाठोपाठ राज कुंद्राचा साथीदार आणि हॉटेल व्यावसिक कुणाल जानीला अटक करण्यात आली आहे. कुणाल जानी हा 24/2020 च्या […]

Mumbai Tak

दिव्येश सिंह

• 09:16 AM • 30 Sep 2021

follow google news

अंमलबजावणी प्रतिबंधक विभागाने (NCB) हॉटेल व्यावसायिक कुणाल जानीला अटक केली आहे. ड्रग्ज केसमध्ये कुणाल जानीला अटक करण्यात आली आहे. या आधी आगिसिल्स या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आगिसिल्स हा अभिनेता अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचा भाऊ आहे. आता त्यापाठोपाठ राज कुंद्राचा साथीदार आणि हॉटेल व्यावसिक कुणाल जानीला अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

कुणाल जानी हा 24/2020 च्या एका प्रकरणात वाँटेड होता. आता NCB ने त्याला अटक केली आहे. झोनल डायरेक्टर समीर डायरेक्टर यांनी ही माहिती दिली आहे. जानी यांची चौकशी करण्यात येते आहे. ड्रग्ज पेडलर आणि ड्रग्ज सिंडिकेट आम्ही गेल्या वर्षी उद्ध्वस्त केलं होतं. त्यासंदर्भातल्या काही लिंक्सची माहिती जानीकडून घेतली जाते आहे असंही समीर वानखडे यांनी सांगितलं.

राज कुंद्राला जामीन मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टीची पहिली पोस्ट चर्चेत

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर जेव्हा बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचं कनेक्शन समोर आलं होतं त्यातही कुणाल जानीचं नाव समोर आलं होतं. रिया चक्रवर्ती आणि कुणाल जानी यांच्यातले काही व्हॉट्स अप चॅट ईडीला यावेळी चौकशीदरम्यान सापडले होते. गेल्या वर्षीही कुणाल जानी याची एनसीबीने सहा तास चौकशी केली होती. त्याने आपला ड्रग्ज प्रकरणाशी काही संबंध नाही असं म्हटलं होतं. मात्र त्याचा संबंध आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

कुणाल जानी हा पॉर्न केसमध्ये अडकलेल्या राज कुंद्राचाही साथीदार आहे. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि रणजीत सिंग बिंद्रा यांचं बांद्रा या ठिकाणी एक रेस्तराँ आहे. त्या ठिकाणी कुणाल जानी संचालक आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात रणजीत सिंग बिंद्राचीही याआधी चौकशी झाली आहे.

Arjun Rampal च्या गर्लफ्रेंडच्या भावाला NCB कडून ड्रग्ज प्रकरणात तिसऱ्यांदा अटक

जून 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला. त्यानंतर बॉलिवूडमधल्या अभिनेत्री, डायरेक्टर्स, निर्माते यांचं ड्रग्ज विश्वाशी असलेलं कनेक्शन समोर आलं होतं. सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला या प्रकरणी तुरूंगातही जावं लागलं होतं. त्याशिवाय भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनाही अटक करण्यात आली होती. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांचीही ड्रग्ज प्रकरणात चौकशी झाली होती. त्यामुळे ते प्रकरण चांगलंच गाजलं होतं.

    follow whatsapp