Jharkhand मध्ये हेमंत सोरेन सरकार पाडतानाही महाराष्ट्र कनेक्शन समोर, नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई तक

• 12:36 PM • 26 Jul 2021

कर्नाटक सरकार पाडत असताना मुंबई कनेक्शन दिसून आलं होतं. आता झारखंड येथील सरकार पाडतानाही महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. लोकशाहीला डावलून सरकार स्थापन करण्याचं कारस्थान समोर आलं आहे असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नाही तर या प्रकरणी आता झारखंड पोलीस याचा नक्कीच तपास करतील अशी अपेक्षा नवाब मलिक यांनी व्यक्त […]

Mumbaitak
follow google news

कर्नाटक सरकार पाडत असताना मुंबई कनेक्शन दिसून आलं होतं. आता झारखंड येथील सरकार पाडतानाही महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. लोकशाहीला डावलून सरकार स्थापन करण्याचं कारस्थान समोर आलं आहे असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नाही तर या प्रकरणी आता झारखंड पोलीस याचा नक्कीच तपास करतील अशी अपेक्षा नवाब मलिक यांनी व्यक्त केली.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले नवाब मलिक?

झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. पैसे देऊन झारखंडमध्ये आमदार फोडण्याचे कट कारस्थान रचलं जातं आहे. असाही आरोप नवाब मलिक यांनी केला. संकटे येतात त्यावेळी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे काम केले पाहीजे. मात्र भाजपचे नेते मा. मुख्यमंत्र्यांबद्दल नको ती भाषा वापरत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव ट्वीट करुन जी भाषा वापरत आहेत ती योग्य नाही असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार आणि आमदार आपलं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक यांनी आरोप का केला आहे?

झारखंड सरकार पाडण्याच्या कट प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांपैकी एकाने चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेतल्याचा आरोप होतो आहे. अशात चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र आपला यामध्ये काहीही हात नसल्याचं म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, ‘मी कधीही झारखंडला गेलेलो नाही त्यामुळे सरकार पाडण्याचा संबंधच नाही. माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही’ असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. मात्र या एका कारणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोप केला आहे. भाजपचं कर्नाटक सरकार पाडण्याचं कनेक्शनही त्यांनी बाहेर काढलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आता झारखंडमध्येही महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव न घेता थेट भाजपवर आरोप केला आहे.

झारखंड सरकार पाडण्याचा कट रचल्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कटात झारखंडचे तीन आमदार, दोन पत्रकार आणि काही मध्यस्थ होते अशीही माहिती या तिघांनी पोलिसांना दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन जण सरकारी कर्मचारी आहेत. तर एकजण दारूचा व्यवसाय करतो. रांची येथील हॉटेलमधून या तिघांना अटक करण्यात आली.

    follow whatsapp