महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना शरद पवारांचा टोला, म्हणाले…

मुंबई तक

• 11:58 AM • 27 Dec 2021

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा आणि सगळा कारभार केंद्राकडे द्या असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्या वक्तव्याचा शरद पवार यांनी आज खरपूस समाचार घेतला आहे. साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज येथील लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला श्रीनिवास पाटील, चेअरमन अनिल पाटील, रयत कौन्सिलचे […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा आणि सगळा कारभार केंद्राकडे द्या असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्या वक्तव्याचा शरद पवार यांनी आज खरपूस समाचार घेतला आहे.

हे वाचलं का?

साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज येथील लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला श्रीनिवास पाटील, चेअरमन अनिल पाटील, रयत कौन्सिलचे रामशेठ ठाकूर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत शरद पवारांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा देत त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

….मग राष्ट्रपती राजवट स्वीकारून कारभार केंद्राकडे द्या -चंद्रकांत पाटील

राज्यातील विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थिर आहे. या सरकारला क्लिअरकट मेजॉरिटी आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी स्थिर सरकार देण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. म्हणूनच ते अशी विधानं करत आहेत. अशी विधाने याआधीही केली गेली होती. त्याचा काही परिणाम झाला नाही. अशा पद्धतीच्या विधानांना नागरिक गांभीर्याने घेत नाहीत, असा टोलाही पवारांनी लगावला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर टीका केली होती. राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायचा असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट स्वीकारावी, असं आव्हान त्यांनी अशोक चव्हाणांना दिलं होतं. मार्च 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही आघाडी सरकारने ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा केला असता तर आतापर्यंत हा प्रश्न सुटला असता. पण आपण काहीही करायचे नाही आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलायची असे आघाडी सरकारचे धोरण आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

‘राज्यातले सगळे प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायचे असतील तर महाविकास आघाडीने राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट स्वीकारावी असं आव्हान आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दिलं. अशोक चव्हाण यांनी जी टीका केली त्या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला. राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायचा असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट स्वीकारावी असे आव्हान त्यांनी अशोक चव्हाण यांना दिलं’

    follow whatsapp