Omicron ला रोखण्यासाठी भारतात पुन्हा लॉकडाऊनची गरज? पाहा तज्ज्ञांचं म्हणणं काय

मुंबई तक

• 09:39 AM • 07 Dec 2021

मुंबई: कोरोना व्हायरसचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) यामुळे लोकांची चिंता पुन्हा एकदा वाढू लागली आहे. नवीन व्हेरिएंटचा वेग आधीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत तीनपट जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत व्हायरसच्या वेगाला ब्रेक लावण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) हा एकमेव मार्ग आहे का? की सरकारने तिसऱ्या डोसचाही म्हणजे बूस्टर डोसचाही विचार करायला सुरुवात करावी? या आणि […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: कोरोना व्हायरसचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) यामुळे लोकांची चिंता पुन्हा एकदा वाढू लागली आहे. नवीन व्हेरिएंटचा वेग आधीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत तीनपट जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत व्हायरसच्या वेगाला ब्रेक लावण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) हा एकमेव मार्ग आहे का? की सरकारने तिसऱ्या डोसचाही म्हणजे बूस्टर डोसचाही विचार करायला सुरुवात करावी? या आणि अशा अनेक प्रश्नांची तज्ज्ञांनी उत्तरं दिली आहेत. जाणून घेऊयात याविषयी सविस्तरपणे.

हे वाचलं का?

संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणतात की, कोणत्याही व्हेरिएंटविरुद्ध लस ही निश्चितपणे संरक्षण प्रदान करते. म्हणजेच, लसीकरण केलेली व्यक्ती लसीकरण न केलेल्या व्यक्तीपेक्षा सुरक्षित असते. परंतु संपूर्ण सुरक्षिततेसाठी दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. ज्यांनी फक्त एकच डोस घेतला आहे, त्यांना शक्य तितक्या लवकर दुसरा डोस घ्यावा. देशात अजूनही 15 टक्के प्रौढ आहेत ज्यांनी कोणताही डोस घेतलेला नाही. अशा परिस्थितीत लोकांमध्ये लसीबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.

बूस्टर डोस म्हणजेच तिसऱ्या डोसबाबत डॉ. लहरिया म्हणाले की, सर्वप्रथम देशातील लसीकरण न झालेल्या लोकसंख्येला एक डोस देण्याची गरज आहे. शास्त्रज्ञ आणि तांत्रिक तज्ज्ञ उर्वरित बूस्टर डोसबद्दल आपलं मत व्यक्त करत आहेत.

लॉकडाऊन करणं गरजेचं आहे?

मागील डेल्टा व्हेरियंटपेक्षा नवीन व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ओमिक्रॉन व्हेरिएंट हा लसीकरण केलेल्या लोकांवरही परिणाम करत आहे. अशा स्थितीत लग्नसराई, पार्ट्या आणि बाजारपेठेतील वाढती गर्दी यामुळे पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळू शकतं.

व्हायरोलॉजिस्ट डॉ. दीपक आचार्य याविषयी म्हणाले, ‘ओमिक्रॉनला सामोरे जाण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही. लोकांनी स्वतः सावध राहणे अधिक महत्त्वाचे आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका. लॉकडाऊनपेक्षा स्वयं-निर्बंध हेच तुमचे व्हायरसपासून अधिक संरक्षण करेल.

कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी याबाबत सांगितले की, ‘कोरोनाचा नवीन व्हेरिएंट समोर आल्याने लोकांना घाबरण्याची गरज नाही. त्याचे नवे रुग्ण सापडणं ही खरं तर भारतासाठी चांगली गोष्ट आहे. असे केल्याने आपण त्याचा प्रसार होण्यापासून रोखू शकतो. हा धोका टाळण्यासाठी चेहऱ्यावर योग्य प्रकारे मास्क लावा. बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही डबल मास्क घालू शकता. याशिवाय ज्या लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर डोस घ्यावा.’

डॉ. राहुल म्हणाले की, ‘आरोग्यासोबतच आपली अर्थव्यवस्थाही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही देशात फ्लाइट किंवा कॅबने प्रवास करू शकता, पण त्यादरम्यान तुमची सामाजिक जबाबदारी लक्षात ठेवा. जर तुम्ही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर त्वरित स्वत: कोरोना चाचणी करुन घ्या. जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर स्वतःला क्वॉरंटाइन करण्यात अजिबात उशीर करू नका. ही नैतिक जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली तर लॉकडाऊन किंवा कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाची गरज भासणार नाही.’

पिंपरी-चिंचवड : धाकधुक वाढली, परदेशातून आलेल्या १० प्रवाशांना कोरोनाची लागण

दरम्यान, देशात आता हळूहळू ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ही वाढू लागली आहे. त्यामुळे आता सरकारच्या चिंतेतही भर पडत आहे. सध्या आपली अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी जर पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ती अतिशय चिंतेची बाब ठरु शकते.

    follow whatsapp