Oxygen च्या कमतरतेमुळे महाराष्ट्रात कुणाचाही मृत्यू नाही, कोर्टात प्रतिज्ञापत्र-राजेश टोपे

मुस्तफा शेख

• 01:33 PM • 21 Jul 2021

ऑक्सिजनच्या कमतरेमुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकही मृत्यू झालेला नाही असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने कोर्टात दाखल केलं आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातली माहिती दिली. हे वास्तव आहे कारण महाराष्ट्रात जेव्हा ऑक्सिजनची जेवढी गरज होती ती भागवली गेली आहे. 100 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा आम्ही रूग्णांना केला आहे. इंडस्ट्रीजचा ऑक्सिजन न देता त्याचं रूपांतर […]

Mumbaitak
follow google news

ऑक्सिजनच्या कमतरेमुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकही मृत्यू झालेला नाही असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने कोर्टात दाखल केलं आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातली माहिती दिली. हे वास्तव आहे कारण महाराष्ट्रात जेव्हा ऑक्सिजनची जेवढी गरज होती ती भागवली गेली आहे. 100 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा आम्ही रूग्णांना केला आहे. इंडस्ट्रीजचा ऑक्सिजन न देता त्याचं रूपांतर लिक्विड ऑक्सिजनमध्ये करून आम्ही तो ऑक्सिजनही कोरोना रूग्णांना पुरवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या अभावी एकही मृत्यू झालेला नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हे वाचलं का?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता भासत होती त्यावेळी आम्ही इतर राज्यांमधून ऑक्सिजन मागवला. ऑक्सिजन नर्ससारखे उपाय योजले. एवढंच नाही तर थोडा सुद्धा ऑक्सिजन वाया जाऊ नये म्हणून खबरदारी घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या अभावी कुणाचाही मृत्यू झालेला नाही. ऑक्सिजनचं प्रॉपर मॅनेजमेंट आणि ऑक्सिजनची बचत करणं हे आम्ही अगदी काटेकोरपणे केलं. महाराष्ट्रात रोज 65 हजार रूग्ण पॉझिटिव्ह आढळत होते तेव्हाही आम्ही ऑक्सिजन कमी पडू दिला नाही. तसंच थोडासाही ऑक्सिजन आम्ही वाया जाऊ दिला नाही असंही राजेश टोपेंनी स्पष्ट केलं.

आणखी काय म्हणाले राजेश टोपे?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जे मृत्यू झाले आहेत ते कोरोनाच्या कारणानेच झाले असले तरीही कोरोना रूग्णाला ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून कुणाचाही मृत्यू झालेला नाही. महाराष्ट्रात उत्पादन होणारा ऑक्सिजन हा आपण लिक्विड ऑक्सिजनमध्ये रूपांतर केलं. इंडस्ट्रीला आपण त्या काळात शून्य टक्के ऑक्सिजन दिला आहे. आपली प्राथमिकता ही कोरोना रूग्णच होते. त्यामुळे ऑक्सिजनच्या अभावी महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रूग्ण दगावलेला नाही असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. ऑक्सिजनचं योग्य नियोजन, अत्यंत काटकासरीने व्यवस्थापन केलं त्यामुळे ऑक्सिजन वाया गेला नाही. लिकेज होणार नाही याची काळजी घेतली. 1700 मेट्रिक टन एवढी आपली गरज होती तीदेखील आपण भागवली असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. ऑक्सिजनची तारांबळ झाली, रात्रीतून ऑक्सिजन पोहचला नाही तर काय होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. पण तरीही सगळं नियोजन व्यवस्थित पार पडलं. नाशिकमध्ये एक घटना घडली ती ऑक्सिजनच्या लिकेजमुळे झाली. ते वेल्डिंगच्या कारणामुळे झालं, मात्र आम्ही कोर्टात जे प्रतिज्ञापत्र दिलं आहे त्यात स्पष्ट केलं आहे की ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू झालेला नाही.

    follow whatsapp