सचिन वाझेंना अटक, फडणवीस म्हणतात…आता तर सुरुवात झाली आहे!

मुंबई तक

• 10:28 AM • 14 Mar 2021

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्फिओ गाडी प्रकरणी NIA ने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आल्यानंतर सत्ताधारी पक्षाने भाजप मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचं म्हटलं. याला […]

Mumbaitak
follow google news

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्फिओ गाडी प्रकरणी NIA ने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आल्यानंतर सत्ताधारी पक्षाने भाजप मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचं म्हटलं. याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी, वाझेंशी माझी दुष्मनी नाही. ते काळे की गोरे हे देखील मी पाहिलं नाही. पण मुंबई पोलीस दलातील एक अधिकारी जर अशाप्रकारे काम करत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेवर कसा विश्वास राहिलं? असं उत्तर दिलं.

हे वाचलं का?

सचिन वाझेंचं सत्य बाहेर आलं तर ठाकरे सरकार पडेल- कंगना राणौत

यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी आता तर नुसती सुरुवात झाली आहे. या प्रकरणाचा एक भाग समोर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे असं सांगितलं. दुर्दैवाने राज्य सरकारच्या वतीने आतापर्यंत वाझे यांना पाठीशी घालण्याचं काम करण्यात आलं. ते ओसामा बिन लादेन आहेत का वगैरे प्रश्न विचारुन त्यांची वकिली करण्याचं काम सरकारने केलं. पण NIA ने तपास हाती घेतल्यानंतर आता त्यांना यामध्ये महत्वाचे पुरावे मिळत आहेत. हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणीही काही महत्वाचे धागेदोरे आणि पुरावे केंद्रीय तपासयंत्रणांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे हे प्रकरण सचिन वाझेंपुरतं मर्यादीत नाही. त्यांना कोणी पाठींबा दिला, यामागे कोण आहे हे देखील आगामी काळात पुढे येईल.

सचिन वाझेंना अटक, शरद पवार म्हणतात…

विरोधीपक्ष मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवून त्यांची बदनामी करत असल्याच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “उच्च न्यायालयाचा आदेश डावलून सरकारने वाझे यांना सेवेत घेतलं. याआधी ते शिवसेनेत होते म्हणून म्हणून प्रत्येक प्रकरण त्यांच्याकडे दिलं जायचं का? Crime Intelligence Unit सारख्या महत्वाच्या विभागाची जबाबदारी वाझेंकडे कशी सोपवण्यात आली. त्यामुळे ज्या पोलीस अधिकाऱ्यावर संशय आहे तोच अधिकारी या प्रकरणाचा तपास कसा करु शकतो? भाजपवर आरोप करणाऱ्यांनी आरशात पहायला हवं. अशा घटनांमुळे मुंबई पोलिसांची चांगली इमेज तयार होते का?? या घटनेत विरोधीपक्षनेता म्हणून मी माझं काम केलं. त्यामुळे याची माहिती मला कशी मिळाली आणि ही माहिती मला विधानसभेत का मांडावी लागली याचं उत्तरही संजय राऊतांनी द्यावं”, असं म्हणत फडणवीसांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

    follow whatsapp