नव्या वर्षात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट पुन्हा एकदा डोकेदुखी ठरणार असल्याची चिन्हं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉन व्हेरिएंट देशात हातपाय पसरवताना दिसत असून, देशातील एकूण रुग्णसंख्या 415 वर पोहोचली आहे. निर्बंधांचा वेढा पडलेल्या महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन रुग्ण राज्यात आढळून आले आहेत.
ADVERTISEMENT
देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 415 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे 415 पैकी 115 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर उर्वरित रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात म्हणजे 108 रुग्ण आढळू आले आहेत.
Omicron : महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 20 नवे रूग्ण, एकूण संख्या 108
महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमाकांवर राजधानी दिल्ली आहे. दिल्लीतील रुग्णसंख्येचा आकडा 79 वर पोहोचला आहे. तिसऱ्या क्रमांकांवर गुजरात असून, तिथे 43 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर तेलंगानात 38, केरळात 37, तामिळनाडूमध्ये 34 रुग्ण आढळून आले आहेत.
केंद्र सरकारने दिलेल्या ताज्या माहितीनुसार 358 ओमिक्रॉन बाधितांपैकी 183 जणांचा अभ्यास केला जात आहे. यात 91 जणांनी लसीचे दोन्ही डोज घेतलेले असल्याचं समोर आलं आहे. तर तीन जणांनी बुस्टर डोस घेतलेला आहे. 70 टक्के रुग्णांना लक्षणं दिसून आली नाहीत, असं केंद्राने म्हटलं आहे.
मुंबई : डॉ. लाल पॅथलॅबमधील 12 कर्मचारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह, महापालिकेनं लॅब केली सील
महाराष्ट्रात निर्बंध
ख्रिसमससह नववर्षांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं लोक एकत्र येण्याची तसेच सेलिब्रेशनसाठी होणाऱ्या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध कडक केले आहेत. मुंबईत नववर्षनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तर राज्यातही रात्री 9 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
अहमदनगर : नवोदय विद्यालयात कोरोनाचा उद्रेक; 19 विद्यार्थी आढळले कोरोना पॉझिटिव्ह
तिसऱ्या लाटेचा इशारा
ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर जगभरात सावध पावले उचलण्यात आली. ब्रिटनसह काही देशांनी बुस्टर देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे ब्रिटनमध्येही ओमिक्रॉनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. भारतात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढल्यास तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला असुन, फेब्रुवारीमध्ये तिसऱ्या लाटेचा उद्रेक होईल अशी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना अवलंबल्या जात आहेत.
ADVERTISEMENT
