ADVERTISEMENT
महाराष्ट्रासह असंख्य वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या विठू माऊलीच्या मंदिराचं आज रुपडंच पालटलं आहे.
पंढरपुरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाशिवरात्री निमित्त शंभू महादेवाला प्रिय असणाऱ्या बेल पानांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
देवाचा गाभारा, चौखांबी मंडप, सोळा खांबी मंडप या ठिकाणी आकर्षक फुलांची व बेलाच्या पानांची आरास करण्यात आली.
श्री विठ्ठलालाही शंभू महादेवा सारखा गंध लावण्यात आला आहे.
या सजावटीसाठी 700 किलो बेल पानांचा वापर करण्यात आला आहे.
रमेश पांडूरंग कोळी, राणी रमेश कोळी, रुतुजा कोळी, ऋषिकेश कोळी, नवनाथ खिलारे या भक्तांनी ही पूजा अर्पण केली.
पंढरपूरच्या साई डेकोरेटर्स यांनी ही सजावट केली आहे.
ADVERTISEMENT











