तुम्ही कितीही दबाव टाका, समीर वानखेडे झुकणार नाहीत – जास्मिन वानखेडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक ड्रग्ज केस प्रकरणात NCB संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ट्विट केली. फ्लेचर पटेल या एकाच व्यक्तीची तीन प्रकरणांमध्ये पंच म्हणून साक्ष NCB ने घेतल्याचा गौप्यस्फोट मलिकांनी घेतला. तसेच फ्लेचर पटेलचा समीर वानखेडे यांची बहिण जास्मिनसोबतचा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी यामार्फत बॉलिवूडवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता का […]

Mumbai Tak

सौरभ वक्तानिया

• 12:51 PM • 16 Oct 2021

follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक ड्रग्ज केस प्रकरणात NCB संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ट्विट केली. फ्लेचर पटेल या एकाच व्यक्तीची तीन प्रकरणांमध्ये पंच म्हणून साक्ष NCB ने घेतल्याचा गौप्यस्फोट मलिकांनी घेतला. तसेच फ्लेचर पटेलचा समीर वानखेडे यांची बहिण जास्मिनसोबतचा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी यामार्फत बॉलिवूडवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता का असाही सवाल विचारला.

हे वाचलं का?

दरम्यान जास्मिन वानखेडे यांनी यासंबंधी स्पष्टीकरण देत आपले भाऊ समीर वानखेडे यांना पाठींबा दिला असून नवाब मलिकांवर मानहानीचा दावा करण्याचा इशारा दिला आहे.

“समीर वानखेडे एक प्रामाणिक अधिकारी आहेत. तो नेहमी आपल्या कामात असतो, समाजात ड्रग्जच्या माध्यमातून असलेली घाण तो साफ करायचा प्रयत्न करतोय. तो गेले काही दिवसत सातत्याने फोनवर असतो, सामान्य लोकांना ही गोष्ट कळायला हवी. प्रामाणिक माणसं काम करत राहतील. लोकांनी त्याला कितीही झुकवण्याचा प्रयत्न केला तरीही तो झुकणार नाही. तुम्ही आमची चेष्टा केलीत, आमच्या परिवाराला यात मध्ये ओढलं गेलं. जे व्यक्ती आरोप करत आहेत. त्यांनी आधी स्वतःच्या परिवाराकडे पहावं”, अशा शब्दांत जास्मिन यांनी आपल्या भावाची पाठराखण करत नवाब मलिकांना टोला लगावला आहे.

आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी फ्लेचर पटेलच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जास्मिन पटेल यांचा उल्लेख लेडी डॉन असल्याचा दाखला देत, या माध्यमातून बॉलिवूडवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला. याला उत्तर देतानाही जास्मिन यांनी, “काही दिवसांनी ते आणखी काही पुरावा घेऊन येतील. असं करुन ते स्वतःचंच नाव खराब करत आहेत. तुम्ही एका महिलेला ट्रोल करुन तिचा अपमान करताय. मी मनचे चित्रपट सेनेच्या लिगल डिपार्टमेंटची उपाध्यक्ष आहे. ते अक्षरशः वायफळ गडबड करत आहेत. त्यांचं वय आणि जबाबदारीचं पद पाहता त्यांनी पुरावे समोर आणून बोलणं गरजेचं आहे”, असं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे या प्रकरणात आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp