गोसावी आणि समीर वानखेडे यांच्यातील कॉलबद्दल प्रभाकर साईल खोटं बोलतोय – NCB मधील सूत्रांचा दावा

दिव्येश सिंह

• 02:36 PM • 12 Nov 2021

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि पंच के.पी. गोसावी यांच्यावर आरोप करत साक्षीदार प्रभाकर साईलने मोठी खळबळ उडवून दिली होती. प्रभाकर साईलने पत्रकार परिषदेत २ ऑक्टोबरला आर्यन खानच्या अटकेवेळी गोसावी आणि वानखेडे यांच्यात फोनवरुन संभाषण झाल्याचा दावा केला होता. परंतू साईलचा हा दावा खोटा असल्याची माहिती NCB मधील सूत्रांनी दिली […]

Mumbaitak
follow google news

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि पंच के.पी. गोसावी यांच्यावर आरोप करत साक्षीदार प्रभाकर साईलने मोठी खळबळ उडवून दिली होती. प्रभाकर साईलने पत्रकार परिषदेत २ ऑक्टोबरला आर्यन खानच्या अटकेवेळी गोसावी आणि वानखेडे यांच्यात फोनवरुन संभाषण झाल्याचा दावा केला होता. परंतू साईलचा हा दावा खोटा असल्याची माहिती NCB मधील सूत्रांनी दिली आहे.

हे वाचलं का?

NCB मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी गोसावी आणि वानखेडे यांच्यात कोणत्याही प्रकारे कॉलवर संभाषण झालेलं नाहीये. जर त्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारे कॉलवर संभाषण झालं असतं तर ते आतापर्यंत वानखेडेंच्या कॉल डिटेल रेकॉर्डमध्ये समोर आलं असतं. मुंबई पोलिसांची SIT आणि NCB च्या vigilance team च्या चौकशीतही आतापर्यंत याबद्दल काहीच समोर आलेलं नाही. साईल यानी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत आपण गोसावी आणि वानखेडे यांच्यात फोनवरुन कसल्यातरी डीलबद्दल बोलणं सुरु असताना ऐकल्याचं म्हटलं होतं.

शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानीशी भेटीदरम्यान किरण गोसावीने प्रभाकर साईलला आपल्या मोबाईलवर फोन करायला सांगितलं होतं. गोसावीने यावेळी साईलचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये समीर वानखेडे यांच्या नावाने सेव्ह केला होता. प्रभाकर साईलने केलेल्या या दाव्यावरही NCB ने बोट ठेवत साईल हा गोसावीच्या सांगण्यावरुन वागत असल्याचं दाखवून दिलं आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात साईल करत असलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून तो प्रत्येक दिवशी नवनवीन आरोप करुन समीर वानखेडे आणि NCB ची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती NCB च्या एका अधिकाऱ्याने मुंबई तक शी बोलताना दिली. साईल हे सर्व प्रकार कोणाच्यातरी सांगण्यावरुन करत असल्याचा संशयही NCB च्या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

Defamation case : ‘त्या’ कागदपत्रांबद्दल नवाब मलिकांनी न्यायालयात केला खुलासा

अटक केल्यानंतर NCB ने आर्यन खानला एका खुर्चीवर तर इतर आरोपींना जमिनीवर बसायला लावलं हा साईलने केलेला दावाही खोटा असल्याचं NCB च्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय. प्रभाकर साईलनेच शूट केलेल्या व्हिडीओमध्ये इतर आरोपी हे आर्यनच्या बाजुला खुर्चीत बसल्याचं दिसत असल्याचं NCB अधिकाऱ्याने सांगितलं.

आतापर्यंत प्रभाकर साईलने दोनवेळा तपास यंत्रणांसमोर चौकशीसाठी हजर राहून आपला जबाब नोंदवला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp