पुण्यात खळबळ! तरुणीचा मॅसेज अन् डोंगरात भेटण्यासाठी गेला पण, जागीच संपवलं; हत्येपूर्वी शेवटची इच्छा विचारली अन्...

पुण्यात एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाचा जुन्या वैमनस्यातून निर्घृण खून करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी एका तरुणीच्या प्रोफाइलद्वारे त्याच्याशी मैत्री केली आणि त्याला भेटण्यासाठी खेड शिवापूरजवळील मंदिर परिसरात बोलवलं. त्यानंतर, त्याची हत्या करण्यात आली.

साथीदारांनी मिळून जागीच संपवलं, हत्येपूर्वी शेवटची इच्छा...

साथीदारांनी मिळून जागीच संपवलं, हत्येपूर्वी शेवटची इच्छा...

मुंबई तक

• 11:24 AM • 09 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणीचा मॅसेज अन् डोंगरात भेटण्यासाठी गेला

point

पण, साथीदारांनी मिळून जागीच संपवलं..

point

पुण्यातील धक्कादायक प्रकरण

Pune Crime: पुण्यात एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाचा जुन्या वैमनस्यातून निर्घृण खून करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विश्रांतवाडी परिसरातील टिंगरेनगर येथे राहणाऱ्या अमनसिंग सुरेंद्रसिंग गचंड (वय 17) याचे 29 डिसेंबर रोजी अपहरण करून खेड शिवापूरजवळील डोंगराळ भागात हत्या करण्यात आली. पोलिसांना बुधवारी (7 जानेवारी) संध्याकाळी मृतदेह शोधून आढळला असून त्याची अवस्था अत्यंत विदारक होती. 

हे वाचलं का?

तरुणीने मॅसेज करून बोलवलं... 

या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रथमेश चिंधू आढळ (वय 19, रा. उत्तमनगर) आणि त्याचा साथीदार नागेश बालाजी धबाले (वय 19, रा. शिवणे) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याशिवाय पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून अशा एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात सोशल मीडियावरून अमनसिंगला मॅसेज करून घयनास्थळी बोलवणाऱ्या तरुणीचा देखील समावेश आहे.  

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये अमनसिंग आणि प्रथमेश यांच्यात झालेल्या हाणामारीत प्रथमेशला गंभीर दुखापत झाली होती. याच रागातून प्रथमेशने आपल्या साथीदारांसह त्याचा बदला घेण्याची योजना आखली. अमनसिंग इन्स्टाग्रामवर सक्रिय असल्याचं पाहून, त्यांनी एका तरुणीच्या प्रोफाइलद्वारे त्याच्याशी मैत्री केली आणि त्याला भेटण्यासाठी खेड शिवापूरजवळील मंदिर परिसरात बोलवलं. 

हे ही वाचा: समलैंगिक संबंधाच्या नादात महाराष्ट्रातून थेट आग्र्याला पोहोचला, पण... 66 वर्षीय वृद्धाची चक्रावून टाकणारी कहाणी!

बिअर आणि सिगारेटची मागणी, नंतर निर्घृण हत्या

29 डिसेंबरला अमनसिंग दुचाकीवर त्या ठिकाणी पोहोचला आणि तिथे आरोपींनी त्याला डोंगराळ भागात नेलं. तिथे प्रथमेशने हत्येपूर्वी अमनसिंगला शेवटची इच्छा विचारली. त्यावेळी, पीडित अमनसिंगने बिअर आणि सिगारेटची मागितली, त्यानंतर त्यांनी ती आणून दिली. नंतर त्याला स्वतःच खड्डा खणायला लावलं आणि त्यात अमनसिंगला पुरलं. मात्र, तो बाहेर येईल या भीतीने पीडित तरुणाला खड्ड्यातून बाहेर काढून सर्जिकल ब्लेड, कोयता आणि दगडाने त्याचा गळा चिरला आणि नंतर त्याचं डोके ठेचलं. तीन-चार तास हा थरार सुरू होता. अखेर मृतदेह त्या खड्ड्यात पुरून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

हे ही वाचा: महाचावडी: युतीनंतर 'ठाकरे' पहिल्यांदाच 'चावडी'वर, मुंबई Tak वर राज ठाकरेंची Super Exclusive मुलाखत!

अमनसिंग घरी न परतल्याने त्याच्या आईने 31 डिसेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेच्या पथकाने बेळगावहून आरोपींना ताब्यात घेतलं. चौकशीत प्रथमेशने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आता, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

    follow whatsapp