Rahul gandhi : खासदारकी रद्द, राहुल गांधींचा बदलला ट्विटर बायो, बघा काय लिहिलं?

प्रशांत गोमाणे

26 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 08:17 AM)

Rahul Gandhi twitter bio disqualified mp : कॉग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. कॉग्रेस नेत्यांनी देशभरात सत्याग्रह आंदोलनाची हाक दिली आहे. यासह राहूल गांधी यांनी देखील त्यांच्या ट्विटरच्या बायोमध्ये मोठा बदल केला आहे. ट्विटर बायोमध्ये डिस्क्वॉलिफाईड एमपी (disqualified mp) म्हणजेच निलंबित खासदार असा स्वत:चा उल्लेख […]

राहुल गांधींचा बदलला ट्विटर बायो

राहुल गांधींचा बदलला ट्विटर बायो

follow google news

Rahul Gandhi twitter bio disqualified mp : कॉग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. कॉग्रेस नेत्यांनी देशभरात सत्याग्रह आंदोलनाची हाक दिली आहे. यासह राहूल गांधी यांनी देखील त्यांच्या ट्विटरच्या बायोमध्ये मोठा बदल केला आहे. ट्विटर बायोमध्ये डिस्क्वॉलिफाईड एमपी (disqualified mp) म्हणजेच निलंबित खासदार असा स्वत:चा उल्लेख राहूल गांधी यांनी ट्विटरवर केला आहे. या ट्विटर बायोचा स्क्रिनशॉट आता व्हायरल होत आहे. (rahul gandhi changes twitter bio disqualified mp congress satyagrah protest)

हे वाचलं का?

मोदी आडनाव प्रकरणात (modi Surname case) सुरत सत्र न्यायालयाने राहूल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेनंतर लोकसभा सचिवालयाने राहूल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले होते. या प्रकरणात कॉग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून सत्याग्रह आंदोलनाची हाक दिली आहे. कॉग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेतृत्वात राजघाटावर आंदोलन सुरू आहे. तसेच राज्यातही सत्याग्रह आंदोलन सुरु आहे. तसेच राहूल गांधी यांना त्यांच्या ट्विटर बायोमध्ये मोठा बदल केला आहे. राहूल यांच्या बायोमध्ये सदस्य, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि डिस्क्वॉलिफाईड एमपी असे लिहले आहे. राहूल गांधी यांनी ट्विटरवर अशाप्रकारे स्वत:चा उल्लेख करत भाजपचा निषेध केला आहे.

Rahul Gandhi: “अदाणी भ्रष्ट माणूस, मोदी या व्यक्तीला का वाचवत आहेत?”

भ्रष्ट व्यक्तीला पंतप्रधान का वाचवत आहेत?

“माझे नाव सावरकर नाही. माझे नाव गांधी आहे. गांधी कुणाची माफी मागत नाही. मी संसदेत म्हणालो की, मला बोलू द्या. एकदा तरी बोलू द्या. दोनदा चिठ्ठी लिहिली. लोकसभा अध्यक्षांना भेटलो. त्यांनी हसत सांगितले की, बोलू देऊ शकत नाही. मग मला मोदींना विचारावे लागले, ते तर बोलू देणार नाही’, असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. तसेच “नरेंद्र मोदी यांनी हे जे घाबरून जाऊन केले आहे, त्याचा जास्त फायदा विरोधकांना होणार आहे. त्यांनी आमच्या हातात अस्त्र दिले आहे. मोदीजी घाबरले आहेत की, सगळ बाहेर येईल, 20 हजार कोटी रुपये कुणाचे आहेत. घाबरून त्यांनी हे सुरू केले. जनतेच्या मनात एक प्रश्न आलाय की, अदाणी भ्रष्ट माणूस आहे. जनतेला असा प्रश्न पडला आहे की, या भ्रष्ट व्यक्तीला भारताचे पंतप्रधान का वाचवत आहेत? भाजपचे लोक, नरेंद्र मोदी हे या व्यक्तीला का वाचवत आहेत?”, असा प्रश्न राहुल गांधींनी (Rahul Gandhi) उपस्थित केला.राहुल गांधी शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Rahul Gandhi Disqualified: सोनिया, इंदिरा गांधींनाही गमवावी लागली होती खासदारकी, काय घडलं होतं?

प्रकरण काय?

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 2019 मध्ये कर्नाटकमध्ये एक विधान केलं होतं, यात त्यांनी म्हटलं होतं की, “सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं?” त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, सुरत सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधींना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पण त्यांना तात्काळ जामीनही मंजूर करण्यात आला आहे.

    follow whatsapp