कृषी कायद्याविरोधात पुण्यात रेल्वे रोको आंदोलन

मुंबई तक

• 09:53 AM • 18 Feb 2021

पुणे: राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील 80 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती आणि महाविकास आघाडीतील सर्व राजकीय नेत्यांनी पुणे रेल्वे स्टेशन येथे कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेस रेल्वे काही काळ रोखून ठेवत आंदोलन केले. तसेच यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या रेल्वे रोको आंदोलनात […]

Mumbaitak
follow google news

पुणे: राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील 80 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती आणि महाविकास आघाडीतील सर्व राजकीय नेत्यांनी पुणे रेल्वे स्टेशन येथे कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेस रेल्वे काही काळ रोखून ठेवत आंदोलन केले. तसेच यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

हे वाचलं का?

या रेल्वे रोको आंदोलनात काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड म्हणाले की, ‘केंद्राने शेतकर्‍यांच्या विरोधात तयार केलेला कृषी कायदा या विरोधात देशभरात शेतकरी आंदोलन करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मागील 80 दिवसापासून शेतकरी ठिय्या मांडून आहे. तरी देखील केंद्र सरकार कायदे मागे घेत नाही. ही निषेधार्थ बाब असून आम्ही केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करतो. जोवर केंद्र सरकार कायदे मागे घेत नाही. तोवर आम्ही आंदोलन करीत राहणार. असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.

ही बातमी देखील पाहा: शेतकरी आंदोलनाचा भाजपला जोरदार झटका, पंजाबमध्ये काँग्रेसचे जय हो

संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी कायदे मागे घेतले जाणार नसल्याचं स्पष्ट करत शेतकऱ्यांना आंदोलन संपवण्याचं आवाहन केलं होतं. पण आता शेतकरी आणि सरकार यांच्यातली दरी आणखी वाढत चालले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चा या संघटनेनं सरकारविरोधात रेल्वे रोको आंदोलन केलं आहे.

केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे रद्द करावे ही मागणी शेतकऱ्यांनी अद्यापही लावून धरली आहे. तर दुसरीकडे सरकार या कायद्यांमध्ये बदल करण्यास तयार आहे मात्र सरसकट कायदे रद्द करण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलन अद्यापही सुरुच आहे.

    follow whatsapp