शेतकरी आंदोलनाचा भाजपला जोरदार झटका, पंजाबमध्ये काँग्रेसचे जय हो
दिल्ली-हरयाणाच्या बॉर्डरवर गेल्या ३ महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारने आणलेले ३ कृषी कायदे मागे घेण्याची या शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनावर अजून कुठला तोडगा निघताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर कृषी कायद्यांबदद्ल केंद्र सरकारबद्दल सर्वाधिक रोष असलेल्या पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक झाली. आजच्या निकालात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय. […]
ADVERTISEMENT

दिल्ली-हरयाणाच्या बॉर्डरवर गेल्या ३ महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारने आणलेले ३ कृषी कायदे मागे घेण्याची या शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनावर अजून कुठला तोडगा निघताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर कृषी कायद्यांबदद्ल केंद्र सरकारबद्दल सर्वाधिक रोष असलेल्या पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक झाली.
आजच्या निकालात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय. तर कृषी कायद्यावरून एनडीएची साथ सोडणाऱ्या शिरोमणी अकाली दलासोबतच भाजपलाही मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागतंय.
गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयाला आलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीलाही पराभवाचं तोंड बघावं लागतंय.
पंजाब में भाजपा साफ।
जल्द देश भी पंजाब की राह पर चल कर 'स्वच्छ भारत अभियान' के तहत भाजपा का सूपड़ा साफ कर देश को 'नफरत और झूठ' की राजनीति से मुक्त करेगा।
कयोंकि अब किसान की आवाज़ ही देश की आवाज़ है !
— Rohan Gupta (@rohanrgupta) February 17, 2021
जवळपास सगळ्याच पालिकांमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय, तर काही ठिकाणी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळालीय. आतापर्यंत लागलेल्या निकालातून शेतकरी आंदोलनाचा प्रभाव स्पष्ट झालाय.