महाराष्ट्र हादरला, तीन वर्षीय चिमुरडीवर अमानुष अत्याचार, पुरावे नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून खून
Nashik Crime : महाराष्ट्र हादरला, तीन वर्षीय चिमुरडीवर अमानुष अत्याचार, पुरावे नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून खून
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्र हादरला, तीन वर्षीय चिमुरडीवर अमानुष अत्याचार
पुरावे नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून खून
नाशिक : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. केवळ तीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, डोंगराळे गावातील संशयित विजय संजय खैरनर (वय 24) याने घराजवळ खेळत असलेल्या या चिमुरडीला फुस लावून निर्जनस्थळी नेलं. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचारानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीच्या डोक्यात मोठ्या दगडाने वार करत तिचा खून केला. या अत्यंत क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी आरोपी विजय खैरनर याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास जलदगतीने सुरू आहे. चिमुरडीचा मृतदेह अधिक तपासासाठी मालेगावच्या रुग्णालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर अधिक तपशील स्पष्ट होणार आहेत.
हेही वाचा : सांगली : लग्नास नकार दिला, मुलीच्या वडिलांवर तरुणाचा खुरप्याने हल्ला; झटापटीत मुलीचं बोट पूर्णपणे तुटलं










