बीड हादरलं! बायकोचं परपुरुषाशी अनैतिक संबंध, नवऱ्याने बायकोच्या त्रासाला कंटाळून साडीने गळाफास घेत संपवलं जीवन

मुंबई तक

Beed Crime : बीडमध्ये एका पुरुषाने आपल्या कौटुंबिक जीवनाला कंटाळून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आहे. आत्महत्येचं कारण समोर आलं आहे. पत्नी, तिचा बॉयफ्रेंड आणि सासूच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी तिघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बीडच्या केजमध्ये घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.  

ADVERTISEMENT

Beed crime
Beed crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बायको बॉयफ्रेंडसोबत मुलांना घेऊन राहायची

point

मनीषासह मयूरने जातीवाचक शिवीगाळ केली 

point

अखेर नवऱ्याने संपवलं जीवन

रोहिदास हातागळे/ Beed Crime : बीडमध्ये एका पुरुषाने आपल्या कौटुंबिक जीवनाला कंटाळून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आहे. आत्महत्येचं कारण समोर आलं आहे. पत्नी, तिचा बॉयफ्रेंड आणि सासूच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी तिघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बीडच्या केजमध्ये घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.  

हे ही वाचा : ठाणे: पहाटे घर सोडल्यानंतर तिघींचा नाही पत्ता; 3 दिवसांपासून बेपत्ता... ठाणे पोलिसांचं पथक लखनऊला रवाना

बायको बॉयफ्रेंडसोबत मुलांना घेऊन राहायची

घडलेल्या घटनेनुसार, पत्नीचं नाव मनीषा जाधव असे होते. तर आत्महत्या केलेल्या मध्यमवयीन पुरुषाचे नाव उत्तम शिवाजी जाधव असे आहे. मनीषाचे मयूर पाटील-देशमुख नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु होते. मयूरने मनीषासह तिच्या दोन मुलांना भाडेतत्वावर घर घेऊन दिले होते. तेथे एकमेकांना भेटत असल्याचं बोललं जातंय. 

मनीषासह मयूरने जातीवाचक शिवीगाळ केली 

दरम्यान 19 जानेवारी रोजी उत्तम जाधव हा मनीषाच्या राहत्या घरी गेला तेव्हा मनीषासह मयूरने त्याला जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. मनिषा आणि तिचा प्रियकर मयूर देशमुख पाटील यांनी त्याला तेथून हाकलून दिले होते. त्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

हे ही वाचा : 13 ट्रान्सजेंडरपैकी सात जणांना तुरुंगात एचआयव्हीची बाधा, एकजण निघाला पुरुष, म्हणाला, पैशांसाठी...

बायकोच्या अनैतिक संबंधांना कंटाळून नवऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल 

यानंतर उत्तम जाधवने सासू मंगला भारत खाडे, पत्नी मनिषा, प्रियकर मयूर देशमुख पाटील यांच्या त्रासाला कंटाळून हाउसिंग कॉलनी केज येथे राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीने गळफास घेत जीवन संपवलं. दरम्यान, आरोपींवर केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp