गडचिरोली : अंत्यविधी आटोपून परतताना काळाचा घाला, पुलावरून कार कोसळून चुलत भावांचा मृत्यू; तीन जण जखमी
Gadchiroli Car Accident : यादव विठ्ठलराव कोलपाकवार (वय 73, रा. आष्टी) व सुनील मुरलीधर कोलपाकवार (55, रा. बोरी) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात चालक अभिजीत यादव कोलपाकवार (40), अर्चना यादव कोलपाकवार ( रा. आष्टी) आणि पद्मा सत्यनारायण कोलपाकवार ( रा. आष्टी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गडचिरोली : अंत्यविधी आटोपून परतताना काळाचा घाला
पुलावरून कार कोसळून चुलत भावांचा मृत्यू; तीन जण जखमी
Gadchiroli Car Accident : एका नातेवाईकाच्या अंत्यविधीचा दु:खद प्रसंग आटोपून आपल्या घराकडे परतणाऱ्या कुटुंबावर नियतीने क्रूर घाला घातला आहे. आलापल्ली-आष्टी राष्ट्रीय महामार्गावरील दीना नदीच्या पुलावरून कार खाली कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले, तर एकाच कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना 20 जानेवारी रोजी दुपारी खमणचेरू आणि बोरी दरम्यान घडली.
दोघांचा मृत्यू , तीन जण गंभीर जखमी
यादव विठ्ठलराव कोलपाकवार (वय 73, रा. आष्टी) व सुनील मुरलीधर कोलपाकवार (55, रा. बोरी) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात चालक अभिजीत यादव कोलपाकवार (40), अर्चना यादव कोलपाकवार ( रा. आष्टी) आणि पद्मा सत्यनारायण कोलपाकवार ( रा. आष्टी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
हेही वाचा : एकाच खोलीत पाच मृतदेह आणि 3 पिस्तुल; कपाळावर गोळ्या लागलेल्या अवस्थेत आढळल्या डेथ बॉडी; संपूर्ण कुटुंब संपलं
नागेपल्ली येथील रवींद्र तंगडपल्लीवार यांचा मृतदेह 19 जानेवारीला आलापल्ली परिसरात आढळला होता. मंगळवारी (दि. 20) दुपारी त्यांच्या पार्थिवावर नागेपल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीसाठी आष्टी आणि बोरी येथून कोलपाकवार कुटुंबीय आपल्या चारचाकी वाहनाने (एमएच 33 व्ही. 8249) आले होते. विधी आटोपून परत जात असताना, दीना नदीच्या पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार संरक्षक कठडा तोडून थेट नदीपात्रात कोसळली.










