मुंबई : फ्रान्सची तरुणी पाहाताच नराधमातील राक्षस जागा झाला, भररस्त्यात छातीला...

मुंबई तक

Mumbai Crime French girl molested in Khar area : मुंबई : फ्रान्सची तरुणी जात असल्याचं पाहाताच नराधमातील राक्षस जागा, भररस्त्यात छातीला...

ADVERTISEMENT

Mumbai Crime Mumbai Crime
Mumbai Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : फ्रान्सची तरुणी पाहाताच नराधमातील राक्षस जागा झाला,

point

भररस्त्यात विनयभंग करुन पळाला, पोलिसांनी घरातून उचलला

मुंबई : खार परिसरात फ्रान्सच्या तरुणीचा विनयभंग करून पसार झालेल्या आरोपीला अखेर खार पोलिसांनी पकडलं आहे. अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव सुनिल विष्णू वाघेला (वय 25) असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर स्कूटीच्या नोंदणी क्रमांकाचा माग काढला. धारावी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं असून आता तो पोलीस कोठडीत आहे. पुढील चौकशीतून आणखी काही तपशील स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटना कशी घडली?

तक्रारदार तरुणी वांद्रे येथे राहत असून ती व्यावसायिकरित्या फ्रेंच भाषा शिकवते. गेल्या आठवड्यात ती खारमधील एका मैत्रिणीकडे आली होती. रात्री साडेबारा च्या सुमारास ती मैत्रिणीच्या घरातून निघाली आणि मुख्य रस्त्यावरून पायी चालत घरी रवाना होत होती. रस्ता तुलनेने शांत असताना एका स्कूटीवरून आलेल्या युवकाने तिचा पाठलाग केल्याचं दिसून आलं.

तरुणी काही अंतर पुढे गेल्यानंतर आरोपीने स्कूटी थांबवून तिच्या समोर येत अचानक तिच्या छातीला अयोग्य स्पर्श केला. घटना अचानक घडल्यामुळे ती घाबरली आणि मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न करत असतानाच आरोपी स्कूटीवर बसून वेगाने पळून गेला. रात्रीच्या वेळेमुळे आसपास कोणी नसल्याने तो सहज पळ काढू शकला.

हेही वाचा : पालघर साधू हत्याकांडातील आरोपीचा भाजपमध्ये प्रवेश, 5 वर्षानंतर झाला पवित्र

हे वाचलं का?

    follow whatsapp