पालघर साधू हत्याकांडातील आरोपीचा भाजपमध्ये प्रवेश, 5 वर्षानंतर झाला पवित्र

मुंबई तक

Palghar sadhu murder case accused joins BJP : पालघर साधू हत्याकांडातील आरोपीचा भाजपमध्ये प्रवेश, 5 वर्षानंतर झाला पवित्र; काशिनाथ चौधरींच्या हाती कमळ!

ADVERTISEMENT

Palghar sadhu murder case accused joins BJP
Palghar sadhu murder case accused joins BJP
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पालघर साधू हत्याकांडातील आरोपीचा भाजपमध्ये प्रवेश, 5 वर्षानंतर झाला पवित्र

point

पालघर येथे 2020 साली साधूंची जमावाने हत्या केली होती

Palghar sadhu murder case accused joins BJP : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुख्य आरोपी म्हणून काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोपांची राळ उडवली होती. त्याच काशिनाथ चौधरी यांनी रविवारी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर भाजपने केलेल्या आरोपांचे काय झाले? असा प्रश्न जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विचारत आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक नेते काशिनाथ चौधरी यांच्यावर भारतीय जनता पक्षाने गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात जोरदार आरोप केले. काशिनाथ चौधरी हेच साधू हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगून राज्यात रान उठवले. तसेच साधू हत्याकांड प्रकरणावरून संधी मिळताच तत्कालीन ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. साधू हत्याकांड सहन झाले नाही म्हणूनच उठाव केला, असे सांगायला देखील एकनाथ शिंदे यांनी मागे पुढे पाहिले नाही. दरम्यान ज्यांच्यावर एवढे गंभीर आरोप केले तेच काशिनाथ चौधरी भाजपमध्ये आल्याने त्या आरोपांचे काय झाले? असे विरोधक विचारीत आहेत.

साधू हत्याकांडाचे ज्यांच्यावर आरोप त्यांच्याच हाती कमळ

पालघर जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत चौधरी यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. खासदार हेमंत सावरा आणि भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या उपस्थितीत डहाणू येथे चौधरी यांनी शक्तिप्रदर्शन करत कमळ हाती घेतले. काशिनाथ चौधरी यांच्यासोबत 3 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.

हेही वाचा : BMC निवडणुकीआधी फडणवीसांची सगळ्यात मोठी खेळी, उद्धव ठाकरेंना दिलं ‘ते’ पद, सोबत आदित्य ठाकरेंनाही…

हे वाचलं का?

    follow whatsapp