Platform Ticket: प्लॅटफॉर्म तिकिटात मोठी कपात, रेल्वेकडून सामान्यांना दिलासा.. किती रुपयात तिकीट?

मुंबई तक

• 01:28 PM • 26 Nov 2021

मुंबई: भारतात कोरोनाचा कहर कमी झाल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत रेल्वेने सर्व निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच, रेल्वेने सर्व विशेष गाड्या हटवून पूर्वीप्रमाणे सामान्य वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता सामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात कपात करण्याचा निर्णय मध्य रेल्वे घेतला […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: भारतात कोरोनाचा कहर कमी झाल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत रेल्वेने सर्व निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच, रेल्वेने सर्व विशेष गाड्या हटवून पूर्वीप्रमाणे सामान्य वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता सामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात कपात करण्याचा निर्णय मध्य रेल्वे घेतला आहे.

हे वाचलं का?

मध्य रेल्वेने जारी केलेल्या आदेशानुसार आता प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपयांऐवजी पुन्हा एकदा 10 रुपये करण्यात आले आहे. आदेशानुसार, सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत आता पुन्हा 10 रुपये करण्यात आली आहे. हा आदेश 25 नोव्हेंबरपासून लागू झाला आहे.

कोरोना काळात वाढवण्यात आल्या होत्या प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किमती

कोरोना संकट काळात सुरुवातीला रेल्वेचं कामकाज बंद करण्यात आलं होतं. पण नंतर जेव्हा कोव्हिडची परिस्थिती सुधारू लागली तेव्हा रेल्वेने हळूहळू सर्व रेल्वे गाड्या चालवण्यास सुरुवात केली आणि सर्व गाड्यांचे क्रमांक विशेष श्रेणीमध्ये बदलले होते. तसेच रेल्वे तिकिटांच्या दरातही वाढ करण्यात आली होती.

पण यासोबतच रेल्वे स्थानक परिसरात गर्दी वाढू नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती देखील वाढविण्यात आल्या होत्या. तब्बल 50 रुपयांपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर करण्यात आले होते. जेणेकरून प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करता येईल. असा रेल्वे प्रशासनाचा मूळ उद्देश होता.

Mumbai Local : लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मोबाइलवरून काढता येणार लोकलचं तिकिट

रेल्वे पहिल्यासारखी आली रुळावर..

आता कोरोनाची दुसरी लाट जवळजवळ संपली आहे आणि देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणही सुरू आहे. हे पाहता रेल्वेने कोव्हिड संकट काळात ज्या विशेष क्रमांकावरून ट्रेन धावत होत्या त्या आता सामान्य श्रेणीत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेच्या या निर्णयानुसार आता सर्व गाड्यांची संख्या पुन्हा एकदा पूर्वीसारखीच झाली असून गाड्यांच्या संख्येत बदल झाल्याने रेल्वेतील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

    follow whatsapp