Video : वसईत दोन हजाराच्या नोटांचा पाऊस? नोटा गोळा करायला स्थानिकांची रस्त्यावर गर्दी

मुंबई तक

• 09:34 AM • 04 Oct 2021

मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वसई भागात रविवारी संध्याकाळी एक विचीत्र घटना पहायला मिळाली. वसईच्या मधूबन परिसरात भरचौकात दोन हजाराच्या नोटांचा खच पडलेला पहायला मिळाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी इकडे गर्दी केली. परंतू ज्यावेळेला सत्य समोर आलं तेव्हा सर्वांचा हिरमोड झाला. वसईच्या मधूबन भागात रस्त्यावर दोन हजाराच्या नोटांचा खच पडल्याची बातमी कळताच अनेक नागरिक, […]

Mumbaitak
follow google news

मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वसई भागात रविवारी संध्याकाळी एक विचीत्र घटना पहायला मिळाली. वसईच्या मधूबन परिसरात भरचौकात दोन हजाराच्या नोटांचा खच पडलेला पहायला मिळाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी इकडे गर्दी केली. परंतू ज्यावेळेला सत्य समोर आलं तेव्हा सर्वांचा हिरमोड झाला.

हे वाचलं का?

वसईच्या मधूबन भागात रस्त्यावर दोन हजाराच्या नोटांचा खच पडल्याची बातमी कळताच अनेक नागरिक, लहान मुलं रस्त्यावर आली होती. अनेकांनी तर नोटा उचलल्यादेखील…पण ज्यावेळी या नोटा खोट्या असल्याचं कळलं तेव्हा सर्वांचाच हिरमोड झाला. एका वेबसिरीजच्या शुटींगसाठी या बनावट नोटा वापरण्यात आल्या होत्या.

या मार्गाने प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांनीही गाडी रस्त्यात थांबवून या नोटा गोळा करण्याचा प्रयत्न केला. परंतू यामागची खरी कहाणी समजल्यानंतर त्यांनीही तिकडून काढता पाय घेतला. दिवसभर वसईमध्ये या नोटांच्या पावसाची चर्चा मात्र चांगलीच रंगली होती.

    follow whatsapp