रतन टाटा यांनी का लिहिलं चाहत्यांना पत्र?

मुंबई तक

• 08:48 AM • 06 Feb 2021

टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या आजवरच्या कार्याचा विचार करून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी शुक्रवारी सोशल मीडियावर मागणी करणा-या पोस्ट फिरत होत्या. मोटिवेशनल स्पिकर डॉ.विवेक बिंद्रा यांनी सर्वात प्रथम रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारं ट्विट केलं होतं. त्यानंतर #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग ट्रेंड झाला. दिवसभर अनेकांनी पंतप्रधानांना टॅग करत रतन टाटा […]

Mumbaitak
follow google news

टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या आजवरच्या कार्याचा विचार करून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी शुक्रवारी सोशल मीडियावर मागणी करणा-या पोस्ट फिरत होत्या.

हे वाचलं का?

मोटिवेशनल स्पिकर डॉ.विवेक बिंद्रा यांनी सर्वात प्रथम रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारं ट्विट केलं होतं. त्यानंतर #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग ट्रेंड झाला. दिवसभर अनेकांनी पंतप्रधानांना टॅग करत रतन टाटा यांना रत्न पुरस्कार देण्याची मागणी करणारी ट्विट्स केली. पण आता खुद्द रतन टाटा यांनीच या ट्विट्सची दखल घेत त्यांच्या चाहत्यांना पत्र लिहिलं आहे.

रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी शुक्रवारी सोशल मीडियावर मोहिमच चालवली गेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करत रतन टाटा यांना रत्न पुरस्कार द्या, अशी मागणी केली जात होती. त्याचीच दखल घेत, लोकांचं प्रेम पाहून भारावून गेलेल्या रतन टाटा यांनी एक पत्र लिहून सर्वांचे आभार मानले आहेत. शिवाय आपल्याला भारतरत्न मिळावं म्हणून सुरू केलेलं कॅम्पेन थांबवण्य़ाची विनंतीही केली आहे.

आपल्या पत्रात ते लिहितात, मला रत्न पुरस्कार मिळावा यासाठी सोशल मीडियावर तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो, पण मी विनंती करू इच्छितो की मला भारतरत्न मिळावा यासाठी सुरू असलेली मोहिम थांबवावी. मी भारतीय आहे हे माझं मी भाग्य समजतो, देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी मी माझं योगदान असंच देत राहिन.

त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिचा आदर व्यक्त करणा-या पोस्टमध्ये आणखीनच वाढ झाली असून याचसाठी तुमची ओळख प्रेमळ आणि सच्चा माणूस म्हणून करून दिली जाते, म्हणूनच आम्हाला तुमचा आदर वाटतो, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

यापूर्वीही रतन टाटा यांनी आपल्या कंपनीतील माजी कर्मचारी, जुने स्नेही आजारी असल्याचं कळल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी मुंबईवरुन थेट पुणे गाठलं होतं. या संदर्भातला फोटो व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर त्यांचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं होतं. कोणताही डामडौल नाही, गाजावाजा नाही सुरक्षा रक्षकांचा गराडा नाही की, मिडीयाची गर्दी नाही एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे रतन टाटांनी ही भेट घेतली आणि सा-यांनाच सुखद धक्का दिला होता.

त्याच प्रमाणे आताही त्यांनी लिहिलेल्या या पत्रातून पुन्हा एकदा त्यांच्या साधेपणाचं दर्शन घडत आहे. रतन टाटा यांच नाव कायम त्यांच्या समाजपयोगी आणि मानवतावादी कामामुळे चर्चेत असतं. कोरोनाच्या काळातसुध्दा रतन टाटा यांनी मुक्त हस्ते मदत केली होती.

    follow whatsapp