राजीनामा दिला म्हणून राठोडांचं निर्दोषत्व सिद्ध होत नाही !

मुंबई तक

• 11:57 AM • 28 Feb 2021

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चर्चेत असलेले महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर १५ दिवस राठोड प्रसारमाध्यमांसमोर आले नव्हते. अखेरीस राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर राठोड यांनी रविवारी वर्षा बंगल्यावर आपला राजीनामा दिला. दरम्यान विरोधीपक्षांनी यानंतरही सरकारला घेरण्याची तयारी सुरुच ठेवली आहे. […]

Mumbaitak
follow google news

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चर्चेत असलेले महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर १५ दिवस राठोड प्रसारमाध्यमांसमोर आले नव्हते. अखेरीस राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर राठोड यांनी रविवारी वर्षा बंगल्यावर आपला राजीनामा दिला.

हे वाचलं का?

दरम्यान विरोधीपक्षांनी यानंतरही सरकारला घेरण्याची तयारी सुरुच ठेवली आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याविषयात आपली प्रतिक्रिया दिली आहे…”संजय राठोड यांनी आपला राजीनामा दिला म्हणजे निर्दोषत्व बहाल झालं असं होत नाही. याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. तसेच सर्व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागणार आहेत.”

‘या’ प्रकरणामुळे संजय राठोडांना गमवावं लागलं मंत्रिपद –

७ फेब्रुवारीला पुण्यात 21 वर्षीय पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली. या प्रकरणात पूजा चव्हाणच्या काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या ऑडिओ क्लिप व्हायरल एक आवाज हा संजय राठोड यांच्याशी मिळताजुळता असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. त्यातच संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे एकत्र फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर जेव्हा भाजप नेत्यांकडून आरोप करण्यात येत असतान देखील संजय राठोड हे समोर आले नव्हेत. तब्बल 15 दिवसानंतर मीडियासमोर येऊन त्यांनी आपली बाजू मांडली होती. मात्र तरीही विरोधकांनी या प्रकरणी सरकारला घेरणं सुरुच ठेवलं होतं. अखेर वाढता दबाव लक्षात घेऊन आज (28 फेब्रुवारी) संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

राजीनाम्याची नेमकी बातमी पाहा: मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा

    follow whatsapp