रितेश जिनिलियाला मिळालेल्या MIDC च्या भूखंड वाटपाची चौकशी सुरू, उदय सामंत यांनी दिली माहिती

अभिनेते रितेश देशमुख आणि जिनिलिया यांच्या देश अॅग्रो या कंपनीला लातूरमध्ये जो भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. MIDC सीईओ बिपीन शर्मा या प्रकरणाची चौकशी करत असल्याची त्यांनी माहिती दिली. लातूर एमआयडीसीमध्ये रितेश आणि जिनिलिया यांच्या देश अॅग्रो कंपनी महिन्याभराच्या आत […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 05:28 PM • 21 Oct 2022

follow google news

अभिनेते रितेश देशमुख आणि जिनिलिया यांच्या देश अॅग्रो या कंपनीला लातूरमध्ये जो भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. MIDC सीईओ बिपीन शर्मा या प्रकरणाची चौकशी करत असल्याची त्यांनी माहिती दिली. लातूर एमआयडीसीमध्ये रितेश आणि जिनिलिया यांच्या देश अॅग्रो कंपनी महिन्याभराच्या आत १२० कोटी रूपयांचं कर्ज मंजूर करण्यात आला आरोप भाजपने केला होता.

हे वाचलं का?

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रितेश देशमुख आणि जिनिलिया यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याची माहिती दिली.

काय आहे नेमका आरोप?

लातूर MIDC भागात २०१९ पासून भूखंडासाठी १६ उद्योजकांची प्रतीक्षा यादी असताना त्यांना डावलण्यात आलं आणि रितेश जिनिलियाच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड कंपनीला भूखंड देण्यात आला. हा भूखंड केवळ महिन्याभराच्या कालावधीत देण्यात आला. तसंच या कंपनीला एकाच महिन्यात १२० कोटींचं कर्जही मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित आरोप केले आहेत.

भाजपने नेमका काय आरोप केला आहे?

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी राजकीय दबाव आणून एमआयडीसी कडून भूखंड घेतल्याचा आरोप भाजपने

केला आहे.रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे लातूरच्या नवीन एमआयडीसी मध्ये देश ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड नावाने कारखाना उभा करत आहेत. वेटिंग मध्ये अनेक लोक प्रलंबित असताना कारखान्यासाठी midc ने केवळ 15 दिवसात देश अग्रोला भूखंड दिलाच कसा असा सवाल भाजपाने केला आहे.

काय आहे रितेश जिनिलियाच्या देश अॅग्रो कंपनीबाबतची माहिती

कंपनीचं नाव-देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड

कंपनीची स्थापना- २३ मार्च २०२१

कंपनीचे भागीदार- रितेश विलासराव देशमुख, जिनिलिया रितेश देशमुख यांची अर्धी अर्धी भागिदारी

कंपनीचं भाग भांडवल- ७.३० कोटी

    follow whatsapp