रुबिना दिलैक ते निया शर्मा! छोटा पडदा गाजवूनही ‘या’ अभिनेत्रींना राहावं लागलं बेरोजगार

यशस्वी व्हायचं म्हटलं की संघर्ष आणि परिश्रमाशिवाय पर्याय नाही, असं म्हणतात. यातून सर्वांनाच जावं लागतं. कलाकारही याला अपवाद नाहीत. अनेक कलाकार त्यांच्या स्ट्रगलविषयी सांगताना दिसतात. छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींनाही जॉबलेस राहावं लागलं. अलिकडेच रुबिना दिलैकने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना तिच्या स्ट्रगलविषयी सांगितलं. रुबिका म्हणाली, ‘माझ्याकडे काम नव्हतं आणि घरीही बसवत नव्हतं. त्यामुळे रोहित शेट्टीचा खतरो के खिलाडी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:57 AM • 28 May 2022

follow google news

हे वाचलं का?

यशस्वी व्हायचं म्हटलं की संघर्ष आणि परिश्रमाशिवाय पर्याय नाही, असं म्हणतात. यातून सर्वांनाच जावं लागतं. कलाकारही याला अपवाद नाहीत. अनेक कलाकार त्यांच्या स्ट्रगलविषयी सांगताना दिसतात. छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींनाही जॉबलेस राहावं लागलं.

अलिकडेच रुबिना दिलैकने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना तिच्या स्ट्रगलविषयी सांगितलं. रुबिका म्हणाली, ‘माझ्याकडे काम नव्हतं आणि घरीही बसवत नव्हतं. त्यामुळे रोहित शेट्टीचा खतरो के खिलाडी १२ शोची ऑफर स्वीकारली.’

रूबिना दिलैक पूर्वीही अनेक अभिनेत्री काम मिळत नसल्याचं म्हणालेल्या आहेत. निया शर्मा, उर्वशी ढोलकिया, श्वेता तिवारी आणि सुमोना चक्रवर्ती यांचं यात नाव घेतलं जातं. या सर्वच अभिनेत्रींनी छोट्या पडद्यावर त्यांची छाप सोडली आहे. पण आजच्या घडीला या अभिनेत्री बेरोजगार आहेत.

रुबिना दिलैकने ‘शक्तीः अस्तित्व के अहसास की’ या मालिकेत तृतीयपंथी भूमिका साकारली होती. तिची भूमिका चांगली लोकप्रिय झाली होती. मात्र, हल्ली ती घरीच असते. आता ती रोहित शेट्टीच्या ‘खतरो के खिलाडी-१२’ या कार्यक्रमात दिसणार आहे.

अभिनेत्री निया शर्मानेही बरंच स्ट्रगल केला आहे. नऊ महिने निया शर्मा कामाशिवाय होती. ‘एक हजारों में मेरी बहना है’ ते ‘जमाई राजा’ या दोन्ही मालिकांमध्ये बराच मोठा काळ होता. या काळात निया मुंबईत एकटीच राहिली. आपल्याला पुन्हा असं आयुष्य जगायचं नाही, असं निया एकदा म्हणाली होती.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने अभिनयाच्या जोरावर प्रचंड यश मिळवलं. मात्र, तिच्या वैयक्तिक आयुष्यात बरीच उलथापालथ झाली. दुसरं लग्नही टिकलं नाही. या काळात श्वेता तिवारीकडे कामही नव्हतं. त्यानंतर खतरो के खिलाडी ११ मध्ये तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं.

सुमोना चक्रवर्तीने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने म्हटलं होतं की, तिच्याकडे कोणतंही काम नाही. तरीही ती कुटुंब सांभाळतेय. या पोस्टमध्ये तिने तिच्या आजाराविषयी सांगितलं होतं.