गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात निर्माण झालेला तणाव हा सगळ्या जगालाच ठाऊक आहे. आज रशियाने युक्रेवर हल्ला चढवला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाला तोंड फुटलं आहे. युक्रेनची राजधानी किव्ह आणि खारकीव्ह या दोन्ही शहरांमध्ये बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. तसंच युक्रेनने शस्त्रं खाली टाकावीत असंही म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
अशा सगळ्या युद्ध परिस्थितीतही रशियाचे सैनिक युक्रेनच्या महिलांसोबत फ्लर्ट करत आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियन सैनिक युक्रेनियन महिलांना फ्लर्टी मेसेज पाठवत आहेत असा दावा युक्रेनच्या एका महिलेने केला आहे.
युक्रेनच्या महिलेने यासंदर्भातला एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. रशियन सैनिक आम्हाला युक्रेनियन महिलांना सोशल मीडियावर फ्लर्ट करण्याच्या उद्देशाने मेसेज करत आहेत. अनेक सैनिकांनी कथितपणे आपल्या पदांची माहितीही फोटोंसह या महिलांना पाठवली आहे. द सनच्या रिपोर्ट नुसार रशियन सैनिक हे युक्रेनियन महिलांना आकर्षित करण्यासाठी प्रोफाईल डेटिंग अॅपवर अकाऊंट तयार करत आहेत. Dasa Synelnikova नावाच्या एका महिलेने सांगितलं की रशियन सैनिक तिला टिंडरवर मेसेज पाठव आहेत. तसंच रिक्वेस्टही पाठवत आहेत.
33 वर्षांच्या Dasa Synelnikova ने सांगितलं की मी युक्रेनमधील कीव्ह या ठिकाणी राहते. एका मित्राने मला सांगितलं की टिंडरवर अनेक रशियन सैनिक आले आहेत. त्यामुळे मी माझं लोकेशन खाराकिव्ह असं बदललं. मात्र तिथेही रशियन सैनिक मला मेसेज करत आहेत. एका फोटोत एक सैनिक बनियानमध्ये दिसत होता. तर दुसऱ्या एका फोटोत एक सैनिक पिस्तुलासह बेडवर झोपलेला दिसत होता. यांच्यापैकी कुणीही मला आकर्षक वाटला नाही. मी त्यांची रिक्वेस्ट रिजेक्ट केली.
Dasa Synelnikova ने आंद्रेई नावाच्या एका रशियन सैनिकासोबत झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला आहे. आंद्रेईला तिने विचारलं की तू कुठे आहेस? खाराकिव्हमध्ये आहेस का? त्यावर तो म्हणाला की मी खाराकिव्हमध्ये नाही पण त्याच्या जवळ आहे. 80 किमी दूर.
ADVERTISEMENT
