Pooja Chavan Case: संजय राठोड पुन्हा मंत्री होणार?, शिवसेना मंत्र्याच्या वक्तव्यामुळे तुफान चर्चा

मुंबई तक

• 06:49 PM • 10 Jul 2021

वर्धा: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (pooja chavan suicide case) अडचणीत सापडलेले शिवसेना आमदार (Shiv Sena) आणि माजी वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांना वन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारची चांगलीच बदनामी झाली होती. या सगळ्या प्रकरणात राज्य सरकार अडचणीत आल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या दबाबामुळे […]

Mumbaitak
follow google news

वर्धा: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (pooja chavan suicide case) अडचणीत सापडलेले शिवसेना आमदार (Shiv Sena) आणि माजी वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांना वन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारची चांगलीच बदनामी झाली होती. या सगळ्या प्रकरणात राज्य सरकार अडचणीत आल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या दबाबामुळे संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता.

हे वाचलं का?

राजीनाम्यानंतर संजय राठोड हे सक्रीय राजकारणातून काहीसे लांबच असल्याचे दिसून आलं आहे. पण असं असताना आता पुन्हा एकदा त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार की काय? अशी चर्चांनी वेग धरला आहे. अशी चर्चा होण्याचं कारण म्हणजे शिवसेनेच्याच एका दिग्गज मंत्र्यांने त्याबाबत केलेलं एक वक्तव्य आहे.

‘संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. सरकारमध्ये अशा धडाडीच्या लोकांची गरज आहे. त्यामुळे राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात.’ असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या चर्चेला वेग आला आहे.

शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच या सर्व प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारवर देखील प्रचंड टीकेची झोड उठविण्यात आली होती. पण आता संजय राठोड पुन्हा मंत्रिपदी विराजमान होणार का? अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

‘संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. सरकारमध्ये अशा धडाडीच्या लोकांची गरज आहे. त्यामुळे राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होऊ शकतील.’, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. उदय सामंत यांनी शुक्रवारी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, ‘अतिशय गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीतून कष्ट करून मी मंत्री पदापर्यंत पोहोचलो, पण महाराष्ट्रातील अतिशय घाणेरड्या राजकारणामुळे मला माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हे खूप दुर्दैवी आहे.’ असं मत संजय राठोड यांनी व्यक्त केलं होतं.

मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

    follow whatsapp