देवेंद्र फडणवीस बदला घेताहेत का? संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई तक

• 05:52 AM • 18 Jan 2023

Sanjay Raut latest news : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या तैलचित्राचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, कार्यक्रम पत्रिकेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय चर्चा जोरात सुरू झालीये. याबद्दल बोलताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) सरकारला खडेबोल सुनावले. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तैलचित्र कार्यक्रमाच्या पत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव […]

Mumbaitak
follow google news

Sanjay Raut latest news : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या तैलचित्राचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, कार्यक्रम पत्रिकेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय चर्चा जोरात सुरू झालीये. याबद्दल बोलताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) सरकारला खडेबोल सुनावले.

हे वाचलं का?

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तैलचित्र कार्यक्रमाच्या पत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव नसल्याचा मुद्दा त्यांना विचारण्यात आला. संजय राऊत म्हणाले, “प्रोटोकॉल असतो. राजशिष्टाचार असतो. आपण बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावताहेत आणि त्यांचे चिरंजीव जे राज्याचे मुख्यमंत्रीही होते. त्यांना सन्मानाने बोलवतं नाही, म्हणजे तुम्ही राजकारण करता.”

“उद्धव ठाकरे सांगत असतात की, बाप पळवणारी टोळी आलीये. त्यात तथ्य आहे. शिवसेनाप्रमुखांचं तैलचित्र लावता आहात आणि त्यांच्या चिरंजीवांना आमंत्रण नाही. सावरकरांचं तैलचित्र जेव्हा आम्ही लावलं, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांची पत्रिकेत नावं होती. प्रत्येक वेळेला ही प्रथा परंपरा असते”, असं राऊथ म्हणाले.

“संसदेत असो वा विधानसभेत या गोष्टी पाळतात, पण महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि सरकार चालवताना कोणत्याही परंपरा पाळल्या जात नाहीत, असं दिसतंय. तैलचित्रामागे काय राजकारण आहे हे सांगण्याची गरज नाही”, असंही राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्षनेते असताना त्यांना बोलावलं गेलं नाही, त्याचा बदला घेताहेत असं वाटतं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. राऊत म्हणाले, “मला असं वाटतं नाही. फडणवीस हे बदला घेताहेत की नाही, हे मी सांगू शकत नाही, पण महाराष्ट्रात सूड आणि बदल्याचं राजकारण सुरू आहे. बदला घेण्याचं हे मात्र नक्की आहे.”

Sanjay Raut On PM modi Mumbai Visit : मोदींच्या दौऱ्यावरून शिंदे-फडणवीसांना संजय राऊतांनी काढला चिमटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबईत असणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. या दौऱ्याबद्दल राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढत टोला लगावलाय.

त्यांना नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाची संरक्षक भिंत तोडल्याचा आरोप युवा सेनेकडून करण्यात आलाय, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. संजय राऊत म्हणाले, “मागच्या वेळीही विद्यापीठात घाण आणि गोंधळ करून ठेवला होता. पंतप्रधानांची सुरक्षा ही सर्वोच्च आहे. याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. भारताच्या पंतप्रधानांचं मुंबईत स्वागत करतो. मुंबई हे अत्यंत सुरक्षित शहर आहे. सुरक्षेच्या दृष्टीने काही समस्या असती, तर दुसऱ्या जागेवर कार्यक्रम ठेवता आला असता. युवा सेनेनं मुद्दे उचलले आहेत. अर्थात त्यांनी त्या जागेची पाहणी केली आहे. विद्यार्थ्यांशी संबंध आहे. आता सरकार उत्तर देईल.”

PM Modi Mumbai Visit : बरीच कामं आम्हीच केलीये -संजय राऊत

संजय राऊत पुढे असंही म्हणाले की, “पंतप्रधान ज्या कामांच्या उद्घाटनासाठी येताहेत, त्यातील बरीच कामं ही मुंबई महापालिका, शिवसेना किंवा आधीच्या सरकारने केली आहेत. शिवसेनेनं सुरू केलेल्या कामाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान येताहेत, हे एकप्रकारे त्यांनी आमच्याच कामांवर शिक्कामोर्तब केला आहे.”

दावोसमध्ये अनेक सामंजस्य करार झालेले आहेत. त्याबद्दल बोलताना राऊतांनी शिंदे आणि फडणवीसांना टोला लगावला. “मी परत परत सांगतो की, पंतप्रधान उद्या येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी (एकनाथ शिंदे) किंवा उपमुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) त्या व्यासपीठावरून त्यांना विनंती केली पाहिजे की, सव्वा दोन किंवा अडीच कोटींचे जे उद्योग महाराष्ट्रातून पळून नेले, ते आम्हाला परत द्या. हे जर उद्या आम्ही शकलो, तर महाराष्ट्रावर उपकार होतील.”

    follow whatsapp